तांदुळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे आधार बचतगट व महाराष्ट्र शासन कृषी विभाग, इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावता माळी रयत बझारचे आयोजन करण्यात आले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्याहस्ते बझारचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच रमेश वसंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी शेतकरी विश्वनाथ पाटील, सतीश पाटील, बाबासाहेब पाटील यांनी आपल्या शेतातील भेंडी, वांगी, मिरची, मेथी, शेपू अशा शेतात उत्पादन केलेल्या पालेभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या.
यावेळी सरपंच पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादन हे गावातच विक्री करता यावे म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग इस्लामपूर व आधार बचतगटांच्या सहकार्याने सावता माळी बाजार भरविण्यात आला आहे. त्याचा फायदा शेतकरी व ग्राहकांना होणार असून लोकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे.
यावेळी बचतगटाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव नामदेव सावंत, बन्सीधर तोडकर, संजय कांबळे, बाळकृष्ण तोडकर, कृषी सहाय्यक शीतल निंबाळकर, आर. आर. देशमुख जी. आर. सावंत उपस्थित होते
फोटो : २२१२२०२०-आयएसएलएम-तांदूळवाडी सावंत माळी न्यूज
ओळ : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग इस्लामपूर व आधार बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने रयत बझार भरविण्यात आला होता.