सांगलीत महिलांसाठी स्वयंरोजगार शिबिरात कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, संगीता बजाज, प्रेमलाताई साळी आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील सुमन साळी महिला व बालविकास संस्थेतर्फे खण भागात दुर्बल घटकातील महिलांसाठी स्वयंरोजगार शिबिर झाले. उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे उपस्थित होत्या.
शिबिरात महिलांना शिवणकाम, संगणक, मोबाइल दुरुस्ती, कातडी पिशव्या तयार करण्याच्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. शासनाचे स्वयंरोजगाराचे अभ्यासक्रमही शिकविले जाणार आहेत. प्रशिक्षणानंतर व्यवसायासाठी भागभांडवलही शासनाच्या विविध योजनांतून मिळवून दिले जाणार आहे. जयश्री पाटील यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वबळावर उभे राहण्याचे आवाहन केले. कोरे म्हणाल्या, ग्रामीण महिलांसाठी संस्थेमार्फत उपक्रम राबवावेत. त्यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल.
संस्थेच्या सचिव प्रेमलाताई साळी यांनी स्वागत केले. शाहीर प्रसाद विभुते यांनी पोवाडा सादर केला. यावेळी संगीता बजाज, नगरसेवक सागर घोडके, माजी नगरसेवक शेरू सौदागर, अयुब बारगीर, सलीम मुल्ला, ओबीसी संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शोभा वसवाडे, स्नेहल भागवत आदी उपस्थित होते. संयोजन चित्रलेखा कांबळे, यास्मिन सौदागर, प्रतिभा शिंगारे आदींनी केले.