सांगली : भीमा-कोरेगावच्या घनघोर रणसंग्रामाला बुधवारी (दि. ३०) २०३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कळंबी (ता. मिरज ) येथे वीर शिदनाक शौर्य परिषद आयोजित केली आहे. पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. विश्वजित कदम, आनंदराज आंबेडकर यांना परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.
संयोजक प्रमोद इनामदार, मिलिंद इनामदार, अभिजित इनामदार, डॉ. एकादशी लोंढे व नगरसेविका स्वाती पारधी यांनी ही माहिती दिली. भीमा-कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजविणारे वीर शिदनाक यांचे कळंबी हे मूळ गाव होते. गावात त्यांच्या स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू आहे. सध्या एका छोट्या मंदिरात स्मृतींची जपणूक केली आहे. प्रत्येकवर्षी ३० डिसेंबरला अभिवादनासाठी गावोगावचे लोक येत असतात. यंदाही बुधवारी शौर्य परिषद आयोजित केली आहे. महार रेजिनेम्टचे आजी-माजी सैनिक व समता सैनिक दलाचे जवान मानवंदना देतील. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व भीम शाहिरी होईल. या लढाईवर हिंदी चित्रपटाची निर्मिती केली जात असून, त्याचे निर्माते व काही कलाकारही उपस्थित राहणार आहेत.
-----------------