कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत नाही, त्या गावातील आपत्ती
व्यवस्थापन समित्यांनी जबाबदारीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामसमितीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांनी दिला.
चिंचणी (ता. कडेगाव) येथील
ग्रामपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन ग्रामसमितीची बैठक झाली. यावेळी मरकड बोलत
होते. तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव उपस्थित होते.
मरकड म्हणाले की, कडेगाव
शहर आणि विहापूर येथे कम्युनिटी क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहे. वांगी, देवराष्ट्रे, चिंचणी, अंबक, हिंगणगाव बुद्रुक या ग्रामपंचायतींनी गावातील शाळांमध्ये तात्काळ कम्युनिटी क्वारंटाइन सेंटर सुरू करावे. या सेंटरमध्ये गृह विलगीकरणाची सोय नसलेल्या रुग्णांची सोय करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचणी तसेच विलगीकरण
याबाबत नियमभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा.
उपसरपंच दीपक महाडीक, नंदकुमार माने, यासीन इनामदार, सुनील पाटील, वैभव माने उपस्थित होते.
चौकट
होम टू होम सर्व्हे करा
रुग्णसंख्या जास्त असलेल्या
गावांमध्ये होम टू होम सर्व्हे करून
संशयितांच्या कोरोना चाचण्या करा.
याकामी गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक तसेच अंगणवाडी शिक्षकांची मदत घ्या, असे आदेश
प्रांताधिकारी मरकड यांनी आरोग्य विभागास दिले.