वारणावती : धरणग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. सरकारने धरणग्रस्तांचा अंत पाहू नये अन्यथा धरणग्रस्तांची मुले नक्षलवादी बनून शासनास सळो की पळो करून सोडतील, असा खणखणीत इशारा पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी दिला.यावेळी हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब नायकवडी, भारत पाटील, नामदेव नांगरे, मुसा मुल्ला, श्रीपती पाटील व हजारो धरणग्रस्त तरुण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.गौरव नायकवडी म्हणाले, या धरणग्रस्तांच्या त्यागामुळे लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे मळे फुलले आहेत. हे धरणग्रस्तच विकासाचे केंद्रबिंदू आहेत, परंतु शासनाच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. या धरणग्रस्तांकडे पाहण्याची शासनाची वेगळी भूमिका चुकीची आहे. धरणग्रस्तांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य न केल्यास हा धरणग्रस्त तरुण नक्षलवादी बनेल व याची जबाबदारी शासनाची राहील. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर धरणाच्या पाण्याचा थेंबही खाली जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी म्हणाले, खणाला खण व फणाला फण देऊ, असे शासनाने आश्वासन देऊन धरणग्रस्तांना विस्थापित केले; पण आजअखेर अनेक कुुटुंबांना घरे बांधण्यासाठीही जागा मिळालेल्या नाहीत व आवश्यक नागरी सुविधाही दिलेल्या नाहीत. शासनाच्या या वेळकाढूपणाला कंटाळून आज संतप्त धरणग्रस्तांची तिसरी पिढी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय हटणार नाही. शासनाने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.यावेळी बाळासाहेब नायकवडी म्हणाले, धरणग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी क्रांतिकारकांच्या तिसऱ्या पिढीने एल्गार पुकारला असून, यांच्यामागे धरणग्रस्तांचीही तरुण पिढी उतरली आहे. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. यावेळी भाई पाटील, भारत पाटील, मुसा मुल्ला, श्रीपती पाटील, नामदेव नांगरे यांनीही आपल्या व्यथा मांडल्या.मोर्चात सुमारे साडेचार हजार धरणग्रस्त सहभागी झाले होते. हुतात्मानगर येथे पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. धरणग्रस्त हुतात्मानगर येथून मोर्चाने घोषणा देत चांदोली धरणाच्या पायथ्याशी पोहोचले. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. चांदोली धरणाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यांना अडविले : पाणी रोखलेवारणा धरण व प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी धरणातून बाहेर पडणारे पाणी रोखण्याला अधिकाऱ्यांना भाग पाडले. चर्चेसाठी आलेल्या जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना धारेवर धरत सुमारे तीन तास आंदोलनस्थळी रोखून धरले. मागण्यांबाबत पूर्ण हमी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा संतप्त आंदोलकांनी दिला. सायंकाळनंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. चर्चेसाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रशांत साळुंखे व पाटबंधारे विभागाचे अधिकारी विजय पाटील आले होते. त्यांच्या शासकीय चौकटीतील उत्तराना आंदोलकांनी दाद दिली नाही. जुन्या आठवणीज्या चांदोली धरणाच्या गेटवर आंदोलन सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी चांदोली गाव व बाजारपेठ होती. ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने मायभूमीत दाखल झालेले धरणग्रस्त आपल्या घरांचे उरले सुरले अवशेष पाहून हुंदका आवरतच जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत होते. धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रमुख मागण्याप्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा १०० टक्के लाभ मिळावाप्रकल्पग्रस्तांच्या कब्जे हक्काची रक्कम माफ व्हावीप्रकल्पग्रस्तांच्या खात्यावरील अतिरिक्त जमिनींची शहानिशा व्हावीपुनर्वसनाच्या ठिकाणी आवश्यक नागरी सुविधा द्याव्यातमूळ गावच्या शेतीचे व घरांचे व तालीचे पैसे मिळालेले नाहीतनोकरी न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना २० लाख रुपये अनुुदान द्यावेजमीन संपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावाशासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी
अन्यथा धरणग्रस्तांची मुले नक्षलवादी बनतील
By admin | Published: January 12, 2016 12:14 AM