शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

६९९ गावांपैकी तीन गावांमध्येच मीटरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 11:17 PM

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस , कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी २५ हजार ७७ कुटुंबांकडेच पाणी कनेक्शन्स असून उर्वरित कुटुंबे घेत असलेल्या पाण्याचा हिशेबच होत नाही.जिल्ह्यात ३७ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची तहान भागविली जात आहे. यापैकी १७ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद चालवित असून सध्या ११ योजना केवळ वीज बिल थकीत असल्यामुळे बंद आहेत. त्याला पूरक सावळज (ता. तासगाव) योजना २०१४, तर आरग-बेडग, बेळंकी (ता. मिरज) योजना २००७ पासून बंद आहे. येळावी (ता. तासगाव), रायगाव (ता. कडेगाव), वाघोली (ता. कवठेमहांकाळ), नांद्रे-वसगडे (ता. पलूस), मणेराजुरी-कवठेमहांकाळ-विसापूर या पाच योजनांचा वीजपुरवठा मार्चपासून खंडित असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती चालू आहे. पेड (ता. तासगाव) ही योजना आॅगस्ट २०१६ पासून तलावात पाणी नसल्याने बंद आहे. यापैकी बहुतांशी प्रादेशिक योजना ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांच्या पाईपलाईनला गळती आहे. जलशुध्दीकरणासह पंपिंग यंत्रसामग्री कालबाह्य झाल्यामुळे तीही बदलण्याची गरज आहे. या योजना दुरुस्तीसाठी जवळपास शंभर ते सव्वाशे कोटींच्या निधीची गरज आहे.याशिवाय, १९ पाणी पुरवठा योजना शिखर समिती आणि ग्रामपंचायती चालवत आहेत. यापैकीही किल्लेमच्छिंद्रगड, बहे (ता. वाळवा), माधवनगर (ता. मिरज), सावळज (ता. तासगाव), पणुंब्रेतर्फ वारुण, रिळे, कांदे, येळापूर (ता. शिराळा), नेर्ली, नेवरी (ता. कडेगाव) येथील पाणी पुरवठा योजना तीन ते चार वर्षापासून बंद आहेत. कोणतीही तांत्रिक वस्तुस्थिती जाणून न घेता राजकीय दबावामुळे स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिल्यामुळे कोट्यवधीच्या योजना सध्या बंद पडल्या आहेत. याला राजकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत. पूर्वी चार ते दहा गावांसाठी एक योजना केली होती. यामधून अनेक गावे बाहेर पडल्यामुळे मोठ्या योजनांचा बोजा छोट्या गावांवर पडल्यामुळे त्यांच्या खिशाला योजनेचे पाणी परवडत नसल्याचे दिसत आहे.योजना केल्यानंतर कुटुंबांना पाणी कनेक्शन घेण्याची सवयच लावली नसल्यामुळे पाण्याचा बेकायदेशीर वापर वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात १२ प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ८८ गावांमध्ये ५८ हजार २८५ कुटुंब संख्या असताना, केवळ २५ हजार ७७ नळ जोडण्या आहेत. ३३ हजार २०८ कुटुंबियांकडे पाणी कनेक्शनच नाहीत. सार्वजनिक नळातूनच पाण्याचा वापर होत आहे. याहीपेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे, जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ वाळवा तालुक्यातील बिचूद, येडेनिपाणी व मिरज तालुक्यातील हरिपूर या गावामध्येच नागरिकांना मीटरने मोजून पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा लेखाजोखा...योजनेचे नाव गावे कुटुंबे नळ जोडण्या थकीत पाणीपट्टी सद्यस्थितीकासेगाव मूळ ७ ६४१७ ३००० ३५१४७९२८ नूतनीकरण सुरुकासेगाव नवीन ७ ३८६९ १९९९ नूतनीकरण सुरुनवेखेड-जुनेखेड २ १०४१ ७८९ ३७७१२९४ योजना सुरळीत सुरुतुंग-बागणी ४ १४१२ ११४५ ४८१३७४७ दुरुस्तीची गरजवाघोली ३ ३८३ १०३ ५८८१९९ योजना बंदनांद्रे-वसगडे ५ १५४० ११५१ १५१८०४५६ दुरुस्तीची गरजमणेराजुरी/कवठेमहांकाळ/ ३१ २१०८७ ६३३८ २१५४३१२१ योजना बंदविसापूरपेड ५ ३६८३ १३६१ ४६०२३७९ योजना बंदयेळावी ९ ४७२० १२३७ २६८८९९५ योजना बंदकुंडल १४ ३९४७ ७८८७ २८२२०९६२ दुरुस्तीची गरजएकूण ८८ ५८२८५ २५०७७ ११७०५१४९०