शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

वारणा पात्राबाहेर, कृष्णा इशारा पातळीकडे; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:22 PM

२७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले

सांगली : धरण क्षेत्रात मुसळधार, तर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण ७४.३८ टक्के भरल्यामुळे धरणातून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता २१ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, सांगली आर्यविन पूल येथे पातळी ३४ फुटांवर गेली आहे. वारण धरण ८८ टक्के भरल्यामुळे तेथूनही १० हजार ४६० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर, तर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. नदीकाठची कुटुंबे, पशुधनाचे स्थलांतर सुरू आहे.जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या सहा दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळ्यात चोवीस तासांत ५०.१ मिलिमीटर, तर चरण परिसरात १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या ठिकाणी ढगफुटीसदृश असाच पाऊस झाला आहे. वाळवा, मिरज, पलूससह दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातही संततधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्या, ओढ्यासह नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे २७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले आहेत.वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून, कुटुंबीयांनी तेथून पशुधन हलविले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी गुरुवारी दिवसभरात अडीच फुटांनी वाढून सायंकाळी सांगली आर्यविन पूल येथे ३३ फुटांवर गेली आहे. सांगली, मिरज शहरांतील उपनगरांमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. या परिसरातील १८६ लोकांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे.जिल्ह्यात २०.५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे - मिरज १५.४ (३८४.३), जत ४.७ (२६७.२), खानापूर १९.८ (३१८.१), वाळवा २७.५ (५९०.६), तासगाव १९ (३८३.८), शिराळा ५०.१ (८४७.३), आटपाडी ९ (२४०.४), कवठेमहांकाळ ७.३ (३६०.७), पलूस २४ (४१२.२), कडेगाव २६.१ (४०९.२).

जिल्ह्यातील पाणीपातळीपाणी पातळी - फूट इंचामध्येकृष्णा पूल कऱ्हाड २३.०३बहे पूल ११.०९ताकारी पूल ३७भिलवडी पूल ३५.०६आयर्विन ३३राजापूर बंधारा ४६.०३राजाराम बंधारा ४३.०४

११० नागरिक, ७६३ पशुधनाचे स्थलांतरवारणा नदीपात्रात पाणी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा तालुक्यातील भरतवाडी, कणेगाव व शिराळ्यातील देववाडी, चिकुर्डे या गावांतील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शिराळा तालुक्यातील ५७ ग्रामस्थांचे आणि ६७७ जनावरांचे, तर वाळवा तालुक्यातील ५३ ग्रामस्थ आणि ८३ जनावरे अशा ११० ग्रामस्थांचे आणि ७६३ जनावरांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील १०४ गावांना पुराचा धोका असल्यामुळे प्रशासन त्याठिकाणी अलर्ट आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी