शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्य शासनाने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे शेती कर्जाचे ९९४ कोटी रुपये थकीत आहेत. यात पीक कर्जासोबतच शेतीपूरक मध्यम व दीर्घ कर्जाचा समावेश आहे. थकीत आणि नियमित कर्जाचा आकडा सव्वादोन हजार कोटीवर जातो. अद्याप कर्जमाफीच्या निकषाबाबत कोणतीच सुस्पष्टता नसल्याने, नेमकी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, हे निकष समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी गेल्या आठवड्यात आंदोलन छेडले. शेतकरी संपावर गेल्याने राज्य शासनही हादरले होते. अखेर कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली. शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीशी चर्चा झाल्यानंतर रविवारी सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. अल्पभूधारकांचे कर्ज तातडीने माफ करून त्यांना नवीन कर्ज घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यानुसार जिल्हा अग्रणी बँकेकडून शेती कर्जाची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. अजून कर्जमाफीचे निकष निश्चित झालेले नाहीत. येत्या महिन्याभरात निकष ठरल्यानंतर, नेमकी किती कर्जमाफी होणार हे स्पष्ट होणार आहे. सध्याच्या थकीत पीक व शेतीपूरक कर्जात शासकीय नोकरदार शेतकऱ्यांच्याही कर्जाचा समावेश आहे. त्यांना वगळून कर्जमाफी देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यात अजून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. थकीत आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय झाल्यास, जिल्ह्याला किमान सव्वादोन हजार कोटीच्या कर्जमाफीची शक्यता आहे. जिल्ह्यातील ३० बँकांकडून शेती कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे. त्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे. उर्वरित राष्ट्रीयीकृत बँकांनी कमी-अधिक प्रमाणात शेतीसाठी कर्जपुरवठा केला आहे. तर शेतीपूरक मध्यम व दीर्घ मुदतीची ३६ हजार रुपयांची १८७ अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे थकबाकी आहे. यात पन्नास हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या कर्जाचा समावेश आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडे जिल्ह्यातील ९१ हजार ४२ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे रुपयांचे कर्ज थकीत आहे. पीककर्जाची स्थिती (३१ मार्चअखेर)कर्जशेतकरीरक्कम (कोटीत)पन्नास हजारांपर्यंत२९०५८१२८.३६पन्नास हजार ते एक लाख८१९४१०२.२५एक लाख ते दीड लाख१२०७९१६८.९९दीड लाखापुढे५५५४१२१.९९एकूण५४८५५५२१.५९शेतीपूरक कर्जाची स्थिती (आकडे कोटीत)कर्जशेतकरीरक्कम (कोटीत)पन्नास हजारांपर्यंत१७५४५६६.३५पन्नास हजार ते एक लाख६६७९५०.८२एक लाख ते दीड लाख५६०२७२.९७दीड लाखापुढे६३६१२८२.५७एकूण३६१८७४७२,७१
शेती कर्जाची थकबाकी ९९४ कोटी
By admin | Published: June 12, 2017 11:39 PM