तासगाव ग्रामीण रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ते म्हणाले कोराेनाचा वाढता संसर्ग पाहता तासगाव ग्रामीण रुग्णालयासाठी वीस जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, दहा लहान ऑक्सिजन सिलिंडर चिंटू ऑक्सिजन सिलिंडर, पंधरा मॉनिटर, दहा ऑक्सिजन कॉल सेंटर, दहा बाय पेप मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच ग्रामीण रुग्णालयाशेजारी असणाऱ्या इमारतीत अजून ५० ऑक्सिजन बेड्स सुरू करत आहोत. संपूर्ण विनामूल्य सेवा तासगावकरांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तासगावातील लोकांसाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व उपलब्ध करुन दिले जाईल. महाराष्ट्र शासनाने आमदार फंडातून एक कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी दिली आहे. त्यातील पन्नास लाख कवठेमहांकाळसाठी व पन्नास लाख रुपये तासगावसाठी खर्च करण्यात येणार आहेत.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील, बाळासाहेब गुरव, तासगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गोसावी आर. एस. कांबळे उपस्थित होते.