शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

मिरज कोविड रुग्णालयात ऑक्सिजन वापर पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:19 AM

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून, गेल्या आठवडाभरात ऑक्सिजनचा वापर दररोज दीड हजार ...

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून, गेल्या आठवडाभरात ऑक्सिजनचा वापर दररोज दीड हजार लिटरने वाढला आहे. रुग्णालयास दररोज नऊ हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत असली तरी कोल्हापूर व पुण्यातून दररोज ऑक्सिजनपुरवठा सुरळीत सुरू आहे.

कोविड साथीमुळे मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाल्याने गरीब रुग्णांना मिरज सिव्हिलचा मोठा आधार आहे. मिरज कोविड रुग्णालय एप्रिल महिन्यापासून फुल असून, येथे ऑक्सिजनची गरज असलेले सुमारे ३५० रुग्ण उपचार घेत आहेत. सिव्हिलमध्ये साठ व्हेंटिलेटर व अतिदक्षता विभागातील शंभर बेडना अखंड ऑक्सिजनपुरवठा आवश्यक आहे. कोविड रुग्णालय सुरू झाल्यानंतर प्रत्येकी सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या तीन ऑक्सिजन टाक्या येथे बसविण्यात आल्या आहेत.

एप्रिलपासून सुरू झालेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने दररोज आठ हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू होता. जून महिन्यात रुग्णसंख्या थोडी कमी झाल्याने दररोज साडेसात ते दहा हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू होता. मात्र, जूनअखेरपासून ऑक्सिजनचा खप पुन्हा वाढला असून, दररोज नऊ हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू आहे.

एप्रिल मे महिन्यांत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने पुरवठा अनियमित होता. आता पुण्या- मुंबईत मागणी कमी झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र, ऑक्सिजन मागणीत पुन्हा वाढ होत असल्याने रुग्णालय प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्याचे कोविड सेंटर असल्याने येथे गंभीर रुग्णांची संख्या जास्त असून, व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजनचा दुप्पट वापर होतो. अत्यवस्थ कोरोना रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्‌वासासाठी द्रवरूप ऑक्सिजनचा वापर होतो. जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर बंद झाल्याने सर्व रुग्ण मिरज सिव्हिलमध्ये दाखल होत असल्यानेही ऑक्सिजनचा वापर वाढल्याचे चित्र आहे.

चाैकट

नादुरुस्त प्रेशर व्हाॅल्व्ह बदलले

महिन्यापूर्वी सिव्हिलच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती सुरू झाल्याने सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली होती. ऑक्सिजन प्लांटची तज्ज्ञांकडून तपासणी करून नादुरुस्त प्रेशर व्हाॅल्व्ह बदलण्यात आला आहे. सध्या दरारोज दहा हजार लिटर ऑक्सिजनपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.