फोटो ओळ : पाचुंब्री (ता. शिराळा) येथील अपघातग्रस्त अमोल पाटील यांच्या आईला तुकारामबाबा महाराज यांनी पाठवलेल्या मदतीचा धनादेश शिराळा वारकरी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : पाचुंब्री (ता. शिराळा) येथील वारकरी अमोल युवराज पाटील (वय ३२) यांचा विहिरीवर काम करताना दरड अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाला. घरातील कर्ता माणूस गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते. या कुटुंबाला श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेने मदत केली आहे.
पाचुंब्री येथील घटनेची माहिती शिराळा वारकरी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांना दिली. त्यांनी अपघातग्रस्त वारकरी अमोल यांची आई मालन यांना मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार मदतीचा धनादेश अमोलची आई मालन यांना राजेंद्र माने यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी वारकरी संंप्रदाय मंडळाचे वारकरी उपस्थित होते. तुकारामबाबा महाराज यांच्या श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेने जतप्रमाणेच शिराळ्यातही जनसेवा सुरु करावी, अशी अपेक्षा यावेळी राजेंद्र माने यांनी व्यक्त केली.