सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड नव्या वर्षात २ जानेवारीला होणार आहे. पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडी ३० डिसेंबररोजी होतील. सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकालावधी आज, शुक्रवारी (दि. २०) संपत आहे. नव्या निवडी होईपर्यंत सध्याचेच पदाधिकारी कायम राहण्याची शक्यता असून, त्यामुळे त्यांना दुसºयांदा मुदतवाढ मिळणार आहे.
सध्याचा कार्यकालावधी शुक्रवारी संपत असल्याने प्र्रशासकाची नियुक्ती होणार, की पुन्हा मुदतवाढ मिळणार, याकडे पदाधिकाºयांचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुरुवारी दुपारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला.
कार्यक्रम असा : पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती निवडी ३० डिसेंबररोजी होतील. पंचायत समित्या व त्यांचे पीठासन अधिकारी असे : मिरज - उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख. तासगाव - प्रांताधिकारी समीर शिंगटे. कवठेमहांकाळ - उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे. जत - प्रांताधिकारी प्रशांत आवटी. शिराळा : पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर. विटा - प्रांताधिकारी शंकर बर्गे. कडेगाव - प्रांताधिकारी गणेश मरकड. पलूस - पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे. वाळवा : प्रांताधिकारी नागेश पाटील. आटपाडी - उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे.
जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड २ जानेवारीस होईल. विषय सभापतीपदाच्या निवडी ७ जानेवारीला होणार आहेत. या कार्यक्रमामुळे पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापतींना अध्यक्ष निवडीवेळी उपस्थित राहणे शक्य झाले आहे.पुन्हा अल्प मुदतवाढयानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांना आणखी अल्पशी मुदतवाढ मिळाली आहे. २ जानेवारीपर्यंत त्यांच्याकडे वाहने व कार्यालये कायम राहतील. उपजिल्हाधिकारी विजया यादव यांनी याला दुजोरा दिला. आज, शुक्रवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस आहे. तोपर्यंत मंत्रालयातून आणखी काही आदेश आला, तर प्रशासकाचीही नेमणूक होऊ शकते. जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समित्यांवर गटविकास अधिकाºयाची प्रशासक म्हणून नियुक्ती होईल.