सांगली : स्वरवसंत ट्रस्टतर्फे चौथा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव येत्या १३ जानेवारीस सांगलीत आयोजित केला आहे. जागतिक किर्तीच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
दुसऱ्या सत्रात मुंबईच्या मानसकुमार यांचे व्हायोलियन वादन, बंगळुरूचे पं. प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन आणि त्यानंतर रात्री पं. संजीव अभ्यंकर आणि विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या जसरंगी जुगलबंदीने महोत्सवाची सांगता केली जाणार आहे.
या कार्यक्रमात कै. पं. वसंतराव गुरव संवादिनी वादक पुरस्कार पं. रवींद्र काटोटी यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत ५0 वर्षाहून अधिक काळ टाळवादक म्हणून साथसंगत केलेले ८९ वषींय माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.
महोत्सवात हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर,मिलिंद कुलकर्णी, तर तबलासाथ अजिंक्य जोशी, महेश देसाई, यशवंत वैष्णव व रोहित मुजुमदार देणार आहेत. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका संयोजकांनी ठिकठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत.