शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पणुंब्रे वारुणला आरक्षणाने इच्छुकांचा अपेक्षाभंग

By admin | Published: January 19, 2017 11:23 PM

जिल्हा परिषद मतदारसंघात रंगणार राजकीय द्वंद्व : मणदूर पंचायत समितीसाठी घमासान, गटबाजीला आले उधाण

बालेखान डांगे ल्ल चरणशिराळा तालुक्यातील पणुंब्रे वारूण जिल्हा परिषद मतदार संघ काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पूर्वाश्रमीच्या आरळा मतदारसंघात बदल होऊन याची रचना झाली आहे. त्यातच महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळे मातब्बरांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत गटबाजीला उधाण आले आहे, तर भाजपतही इच्छुकांची मांदियाळी आहे.मागील निवडणुकीत येथे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख गटाने आमदार शिवाजीराव नाईक गटाला धूळ चारली होती. मनसे, शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत राजकीय रंगत आणली होती. पणुंब्रे वारूण जिल्हा परिषद मतदार संघातील मणदूर पंचायत समिती गण खुला झाल्याने इच्छुकांना बळ आले आहे. पंचायत समितीसाठी गतवेळचीच राजकीय रणनीती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आखली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.भाजपमधील धुसफूस आता उमेदवारीच्या रूपाने बाहेर पडत आहे. चरण येथील आमदार शिवाजीराव नाईक यांचे कट्टर समर्थक बी. के. नायकवडी यांनी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षापेक्षा अपक्ष म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. नायकवडी यांचा पवित्रा भाजपला मारक ठरणार असून, आमदार शिवाजीराव नाईक आणि नायकवडी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी पक्षाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची भूमिका मांडून नायकवडी यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. पणुंब्रे वारुण जिल्हा परिषद व मणदूर पंचायत समिती मतदार संघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने आ. नाईक यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.या राजकीय धुळवडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आवाज उंचावला आहे. येथे मनसे स्वबळावर लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे निवडणूक चौरंगी होणार असून, राज्याच्या सतेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी शिवसेना मात्र येथे अस्तित्वहीन आहे.पणुंब्रे वारुण जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसकडून अलका पांडुरंग सुतार, राष्ट्रवादीमधून निलोफर मुनीर डांगे, मनसेतून सुनीता सुतार, भाजपमधून लक्ष्मी नथुराम लोहार यांची नावे चर्चेत आहेत. पंचायत समितीच्या पणुंब्रे गणासाठी भाजपमधून मोहन पाटील, शकील मुजावर, राष्ट्रवादीतून शिवाजी हाप्पे, जयवंत कडोले, काँग्रेसकडून सुभाष सुतार, अब्बास डांगे, अनिल लोहार, मनसेतून धोंडीराम सुतार यांची नावे चर्चेत आहेत.मणदूर पंचायत समिती गणासाठी भाजपमधून प्रकाश जाधव, आनंदा पाटील, राजू नेर्लेकर, काँग्रेसमधून विलास पाटील, योगेश कुलकर्णी, हिंदुराव नांगरे, राष्ट्रवादीतून शिवाजी पाटील, विजय पाटील, सर्जेराव पाटील, मनसेतून दिनकर शिंदे, संजय पाटील आणि अपक्ष म्हणून बी. के. नायकवडी यांच्या नावांची चर्चा आहे.