शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने तीन दिवसांच्या उघडीप दिल्यानंतर हजेरी लावली आहे. या धरणात ११.१३ टीएमसी एकूण तर ४.२५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणातून ६७५ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने ३२९० क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पाथरपुंज येथे ६१, निवळे येथे ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज येथे आजअखेर १ हजार २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या धरणातून मागणीनुसार नदीपात्रात व कालव्यात पाणी सोडण्यात येत होते. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांत पूर्ण उघडीप दिली होती. शुक्रवारी तालुक्यात लहान-मोठ्या सरी पडल्या. यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. चांदोली धरण परिसरात १ जूनपासून ३७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज, निवळे या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली होती. तीन दिवसांनी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धरणात पाण्याची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.चांदोली धरणातून ६७५ क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे तर पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने ३२९० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. शिराळा शहरासह तालुक्यात तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. तीन दिवसांनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पाथरपुंज येथे ११ जून रोजी ६९ मिलिमीटर, २१ रोजी १३३ मिलिमीटर, २३ जून १७६ तर २६ रोजी ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळी ७ पर्यंत पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस
- चांदोली धरण - १५ ( ३७८)
- पाथरपुंज - ६१ (१००२)
- निवळे - ४३ ( ७१२)
- धनगरवाडा - १४ (३९५)
मंडलनिहाय पाऊसकोकरूड - ४.५ (१३८.८०)शिराळा - ४.८ (१४७.८०)शिरशी - ७.८ (२६१.५०)मांगले - ८.३ (१९५.६०)सागाव- ७.५ (१३९.७०)चरण - १५.८ (३३२.७०)