विकास शहाशिराळा (जि.सांगली) : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज (ता. पाटण, जि. सातारा) येथील पावसाने पाच हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. पर्जन्यमानात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर व वलवण या चारही अतिपावसाच्या ठिकाणांना मागे टाकले आहे.सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज व वलवण येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला आहे. पूर्वी कोयनानगर (जि.सातारा) येथील पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद होत. मात्र, २०१९ पासून वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होत आहे.
अभयारण्यातील गावपाथरपुंज हे कोयना विभागाच्या दक्षिण टोकावरील चांदोली अभयारण्यात येणारे हे गाव आहे. या ठिकाणी उच्चांकी पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणातील ‘वसंत सागर’ जलाशयात येते. त्यामुळे चांदोली धरणातील सद्य:स्थितीतील पाणीसाठा ८५ टक्के असून, जादा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाथरपुंज येथील एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये२०१४-१५ - ६,९६८२०१५-१६ - ४,०८०२०१६-१७ - ७,१७५२०१७- १८ - ६,२९०२०१८-१९ - ५,५५०२०१९-२० - ९,९५६२०२०-२१ - ६,४३३२०२१-२२ - ७,०२३२०२२-२३ - ६,९६८२०२३-२४ - ५,०३८(आजअखेर)
“चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा येथे होणाऱ्या पावसामुळे हे धरण भरले आहे. पाथरपुंज येथे एक जून ते ३१ जुलैअखेर ५,०३८ मिलिमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.” - मिलिंद किटवाडकर, उपअभियंता, चांदोली धरण.