जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमधील मैदानात मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कोरोना विलगीकरण सेंटर उभारले आहे. याठिकाणी ३५ बेडची सोय करण्यात आली आहे. सध्या येथे रेठरे धरणमधील २० रुग्ण दाखल झाले. सुसज्य जागेत व मोकळ्या वातावरणात रुग्णांची मानसिकता उत्तम राहत आहे.
याठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेले व जास्त त्रास होत नसलेले रुग्ण आहेत. त्यांना दोन वेळ जेवण, चहा, नाष्टा, तसेच शौचालय, अंघोळीची व्यवस्था केली. येथे तीन नर्स तसेच दिवसभरात वैद्यकीय अधिकारी जितेंद्र मोरे रुग्णांच्या प्रकृतीची देखभाल करीत आहेत.
या विलगीकरण कक्षास कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी भेटी दिल्या. अमोल पाटील, सुहास पाटील, शुभम पवार, बाबूराव पाटील, मनोज पाटील यांच्यासह चार कर्मचारी येथे रुग्णांची सेवा करीत आहेत.