इस्लामपूर : शरद पवारांची भाकरी करपलेली आहे. तीच भाकरीच ते फिरवत आहेत. त्यामुळे इथून पुढेही त्यांचे उमेदवार करपणारच आहेत, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी इस्लामपूर येथील मेळाव्यात लगावला. इस्लामपूर येथील सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्'ांतील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते आ. सुभाष देसाई, रामदास कदम, संपर्क नेते दिवाकर रावते उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे विदर्भ, मराठवाड्यात आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्'ात तीन मंत्री असूनही विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. जत तालुक्यातील गावे पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची तयारी ठेवतात, तर कानडी अत्याचाराला कंटाळलेला सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडतोय. या सर्व जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष आहे.प्रत्येक घरात पोलीस दिला तरी अत्याचार रोखता येणार नाहीत, असे गृहमंत्रीच म्हणू लागले, तर या राज्यातील महिला, मुली सुरक्षित कशा राहतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वर्ष झाले तरी सापडत नाहीत. पोलीस मात्र हत्येचे धागेदोरे हाती लागल्याचे सांगतात, तपासासाठी दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधतात. मग या सरकारने जादूटोणाविरोधी कायदा कशासाठी केला?या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला औषधालासुध्दा ठेवायचे नाही. सांगलीतील पाच जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढविणार असून या सर्व ठिकाणचे / पान ४ वर-- घोटाळेबाजांना जेलमध्ये घालणार..!युतीची सत्ता आल्यावर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे राज्यात दंगली होणार नाहीत. मला सहा महिने गृहमंत्री केल्यास अजित पवारांसह सगळ्या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकेन, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
पवारांची भाकरी करपणारच !
By admin | Published: July 14, 2014 12:30 AM