शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
4
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
5
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
6
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
7
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
8
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
9
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
10
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
11
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
12
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
13
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
14
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
15
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
16
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
17
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
18
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
19
Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
20
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप

Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

By संतोष भिसे | Published: March 16, 2024 6:04 PM

सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती

सांगली : मराठा सर्वेक्षण कामाचे मानधन शिक्षकांना त्वरित अदा करा अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली. मिरजेत तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन दिले.राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार २४ ते ३१ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र मराठा सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. जिल्ह्यात ५०० हून अधिक प्राथमिक शिक्षक या मोहिमेला जुंपले गेले होते. त्याशिवाय महसूल विभाग आणि महापालिकेचे कर्मचारीही कामाला लावण्यात आले. अवघ्या आठवडाभरात संपूर्ण जिल्हा पिंजून काढत घर टू घर सर्वेक्षण करण्यात आले.मराठा कुटुंबासाठी तब्बल १५० प्रश्नावलींचा फॉर्म ऑनलाईन भरण्यात आला. अन्य प्रवर्गासाठी १० प्रश्नांचा फॉर्म होता. इंटरनेटचा अभाव, शेतमळ्यातील प्रवास अशा सर्व समस्यांना तोंड देत युद्धस्तरावर सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. शिक्षकांनीही निर्धारित वेळेपेक्षा अगोदरच सर्वेक्षण पूर्ण केले. आयोगाला ते सादरही करण्यात आले. मात्र या कामाचे मानधन अजूनही जमा करण्यात आलेले नाही.सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती. मराठा कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी १०० रुपये, तर इतरांच्या सर्वेक्षणासाठी १० रुपये मानधन होते. सर्वेक्षण पूर्ण होऊन दीड महिना झाला, पण मानधनाची अद्याप प्रतीक्षाच आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष रमेश मगदुम यांनी तहसीलदार मोरे यांना मानधनासाठी निवेदन दिले. मोरे यांनी सांगितले की, मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुदानाची मागणी केली आहे. तेथून प्राप्त होताच शिक्षकांच्या खात्यांवर त्वरित जमा केले जाईल.

आता निवडणुकीचे कारणदरम्यान, शनिवारपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. त्यामुळे मानधन जमा करण्यात आचारसंहितेचे कारण प्रशासनाकडून पुढे केले  जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वेक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षेतच रहावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणTeacherशिक्षक