यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यात आल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे उल्हासनगर महापालिकेप्रमाणे सांगली महापालिका क्षेत्रातील आशा वर्कर्स महिला भगिनींना १० हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीचे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे व उपाध्यक्ष शरद सातपुते यांनी महापालिकेतील सफाई कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय अनेक प्रश्नाबाबत माहिती दिली. मंत्री शिंदे यांनी सध्याची महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊन आशा वर्कर्स भगिनींना न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार अनिल बाबर, संपर्कप्रमुख उपनेते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते व आनंदराव पवार, संघटनेचे मार्गदर्शक माजी महापौर इद्रिस नाईकवाडी, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, युवा सेनेचे सचिन कांबळे, मिरज तालुका प्रमुख संजय काटे, मयूर घोडके, महिंद्र चांडाळ, मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगूरे व विशालसिंग रजपूत, अमोल पाटील, किरण राजपूत, राजेंद्र पाटील विजय कात्राळे उपस्थित होते.
फाेटाे : ०९ मिरज १
ओळ : आशा वर्कर्सना दहा हजार रुपये द्यावेत या मागणीचे निवेदन महेशकुमार कांबळे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.