फोटो : केंद्रीय लघू व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे स्टँड अप इंडिया अंतर्गत देय अनुदान अदा करण्याची मागणी राज्य ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या वेळी अर्जुन सकट, डॉ. चंद्रमणी उमराणी उपस्थित होते.
जत : नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्टँड ऑफ इंडिया योजनेतून नव उद्योजक तयार झाले आहेत. परंतु, या योजनेतील लाभार्थी गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या अनुदानापासून वंचित आहेत, तरी प्रस्तावित अनुदान मिळावे याबाबतचे निवेदन केंद्रीय सूक्ष्म, लघू केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र राज्य एससी, एसटी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.
मंत्री राणे यांनी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला केंद्र सरकारकडील देय अनुदान देण्याविषयी पाठपुरावा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तसेच नवउद्योजक व लाभार्थी यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी दिल्ली येथे मंत्रालयीन संबंधित सचिवांसमवेत बैठक घेणार असल्याचे सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे या योजनेतील उद्योजक अडचणीत असल्याने बँकेचे हप्ते वेळेत भरले जात नाहीत. यामुळे लघू व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाने केंद्र शासनाकडील थकीत २५ टक्के अनुदान त्वरित द्यावेत. राज्य शासनाने त्यांच्याकडील पंधरा टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन सकट, राज सोनवणे, डॉ. चंद्रमणी उमराणी, मिलिंद कुलकर्णी व जावीर आदी उपस्थित होते.
260921\img-20210926-wa0015.jpg
मागासवर्गीय उद्योजकांना केंद्र शासनाने प्रलंबित अनुदान द्यावे : डॉ. चंद्रमणी उमराणी