ठळक मुद्देअधिकाºयांवर या गाण्याच्या माध्यमातून निशाणा
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय का?’, या सोशल मीडियावर गाजणाºया गाण्याने महापालिकेच्या स्थायी समिती सभेतही हजेरी लावली. काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर, स्थायी सभापती संगीता हारगे आणि अधिकाºयांवर या गाण्याच्या माध्यमातून निशाणा साधला. ‘जनता, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय, महापालिकेत काय चाललंय, तुला माहीत तरी हाय काय’, अशी सुरुवात करीत, ‘जनता पेटलीय, सगळे दमले, त्याची यांना फिकीरच नाय, फिकीरच नाय’, अशी फटकेबाजी केली. महापालिकेतील प्रशासन व पदाधिकाºयांच्या कारभारामुळे नगरसेवकांना जनतेच्या शिव्याशाप खाव्या लागत आहेत. गतिमान प्रशासनाचा नारा दिला जात असला तरी, प्रभागातील कामांना मंजुरी मिळविण्यासाठी अधिकारी, आयुक्तांचे उंबरठे वारंवार झिजविण्याची वेळ नगरसेवकांवर आली आहे. त्यात गत सभेत अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने नगरसेवकांच्या २५ लाखांच्या फायली प्रशासनाने अडविल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला होता. अगदी सभाही तहकूब झाली होती. अखेर रक्कम तबदील करण्याचे विषयपत्र पुढील सभेत सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. बुधवारी सभेत हे विषयपत्रच आले नाही. याबाबत नगरसेवकांनी अधिकाºयांकडे खुलासा मागविला. आयुक्तांनी विषयपत्रावर कालच सह्या केल्याचा खुलासा करण्यात आला. पंधरा दिवस झाले तरी, हा विषय मार्गी लागला नाही. प्रशासनाच्या दिरंगाईचा संदर्भ देत काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी सोनूच्या गाण्यावर पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. जनतेला उद्देशून सादर केलेल्या गाण्यात ‘पाठवलंय अधिकारी, खेबूडकर त्याचं नाव हाय, नाव हाय, जनता पेटलीय, सगळे दमले, त्याची यांना फिकीरच नाय, फिकीरच नाय. महापौर थकले, प्रशासन फिरले, वेळ मारुन यांनी आश्वासन पेरले, देणे-घेणे नाही जनतेचे यांना, पगार यांचा होतोय, महिना ते महिना. शिव्या-शाप खातोय, नगरसेवक शहाणा’, असे म्हणत नगरसेवकांच्या व्यथांना वाट करून दिली. ‘लोक विचारत हाय, नगरसेवक कुठं हाय, कुठं हाय, त्यांना आम्ही उत्तर, द्यायचं काय, द्यायचं काय’, अशी फटकेबाजी केली. ‘विश्वास ठेवला, खुर्चीचा अधिकार दिला, सभापती तिचं नाव हाय, नाव हाय. बाहेरच्याचं ऐकून घात झाला हिचा, घात झाला हिचा, वर्ष गेलं निघून कळलं हाय काय, हाय काय’, असे म्हणत सभापतींवर टोमणे मारले. चोराच्या उलट्या बोंबा : दिलीप पाटीलकाँग्रेसचे नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या ‘सोनू व्हर्जन’ गाण्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असतानाच, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक दिलीप पाटील यांनी मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली. पाटील म्हणाले की, प्रदीप पाटील यांनी सभापती निवडीवेळी काँग्रेसशी गद्दारी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या विद्यमान सभापतींना मतदान करताना प्रदीप पाटील यांचा भरोसा नव्हता काय? आता वर्ष संपत आल्यानंतर त्यांना उपरती झाली आहे. हा प्रकार म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.जनता, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:10 AM