शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगलीकर या निर्णयावर ठाम! म्हणाले, पुणे-मुंबईकरांना देऊ नका सांगलीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 1:54 PM

राज्यातील हॉटस्पॉटमधील लोकांना बाहेर सोडले जाणार नाही. परराज्य अथवा पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या शासनाच्या आदेश आहे. तसेच पण काही सोसायट्यात या लोकांना प्रवेश दिला जात नाही.

ठळक मुद्देपुणे-मुंबईच्या लोकांना सांगलीत प्रवेश नकोआॅनलाईन महासभेत मागणी : विलगीकरण कक्षात ठेवावे.

सांगली : महापालिका क्षेत्रात पुणे, मुंबईतून नागरिक येणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढणार आहे. या नागरिकांना महापालिका क्षेत्रात प्रवेश देऊ नये. हे लोक आले तर त्यांना इन्सिट्युट क्वारंटाईन करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी आॅनलाईन विशेष सभेत केली.

राज्यातील हॉटस्पॉटमधील लोकांना बाहेर सोडले जाणार नाही. परराज्य अथवा पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या शासनाच्या आदेश आहे. तसेच पण काही सोसायट्यात या लोकांना प्रवेश दिला जात नाही. त्यांना कम्युनिटी क्वारंटाईन केले जाईल. दोन हजार लोकांची व्यवस्था होईल, असे नियोजन प्रशासनाच्यावतीने सुरू असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

महापालिकेची विशेष सभा झुम अ‍ॅपद्वारे घेण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात प्रथम आॅनलाईन सभा झाली. सभेला ८० हून अधिक नगरसेवक, अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सभेत मुंबई, पुण्याहून येणाºया नागरिकांबाबत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुंबईतून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यात शहरात मोठ्या संख्येने बाहेरून लोक येणार आहेत. त्यांना महापालिका क्षेत्रात येण्यास अटकाव करावा, अथवा त्यांचे इन्सिट्युट क्वारंटाईन करावे, याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी रोहिणी पाटील, संगीता हारगे, वहिदा नायकवडी, प्रकाश ढंग, निरजंन आवटी यांच्यासह नगरसेवकांनी केली.

होम क्वारंटाईनमधील अनेक लोक बाहेर फिरत असल्याबद्दलही नर्गिस सय्यद, पांडूरंग कोरे, योगेंद्र थोरात यांच्यासह नगरसेवकांनी तक्रारी केल्या.सभेतील निर्णय

  • घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत सक्ती नाही
  • परवाने, दाखले घरपोच देण्यासाठी प्रयत्न
  • शेरीनाल्याचे पंप सुरू करण्यासाठी प्रयत्न
  • महापालिका शाळेत ई लर्निंग सुरू करणार
  • अमृत, ड्रेनेजची कामे सुरू होणार
  • दिव्यांगानंतर गोरगरीबांना कीट उपलब्ध करून देणार
  • सफाई कामगारांना कीट देणार

 

 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस