जत : जत पंचायत समितीच्या बचतभवन सभागृहाची दुरवस्था झाली असून, हे सभागृह जीर्ण झाले आहे. या सभागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यानी पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले की, जिल्ह्यात सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेने ३५ वर्षांपूर्वी बचत भवनची बांधकामे केली होती. जत येथील बचतभवन सभागृहाची इमारत वगळता जिल्ह्यातील बहुतांशी इमारती पाडण्यात आल्या आहेत. जत येथील इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे. ही इमारत जत पंचायत समिती विविध कार्यक्रमासाठी भाड्याने देत आहे. सद्यस्थितीत या इमारतीचे खालील बाजूचे प्लॅस्टर निघाले आहे. इमारतीच्या पश्चिम बाजूची दुरवस्था झाली आहे. इमारतीचे लोखंड गंज मोडकळीस आले आहे. सध्या स्केटिंग, सामाजिक व राजकीय कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जीर्ण इमारत पंचायत समिती भाड्याने देऊन अनेक नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचे काम करीत आहे. इमारतीत होणारी मोठी दुर्घटना टाळायची असेल तर इमारतीचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. बचतभवन जतचे जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट व जीर्णोद्धार होत नाही, तोपर्यंत ही इमारत कोणालाही वापरायला देऊ नये, अशी आमची मागणी आहे.
230921\1938-img-20210923-wa0013.jpg
बचतभवन जतचे स्ट्रक्चरल ऑडीट करा
जि.प.सदस्य -सरदार पाटील