पेठ : आत्मशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असून, ही संस्था गरुडझेप घेत आहे. हणमंतराव पाटील यांच्या घालून दिलेल्या आदर्शावर चाललेली संस्था सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्ती पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे कर्मचारी पांडुरंग शिंदे हे कोरोनामुक्त झाले. त्यांना आथिर्क मदत म्हणून पंचवीस हजार रुपये धनादेश आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील होते.
यावेळी अतुल पाटील, विजय पाटील, कृष्णा बँकेचे संचालक नामदेव कदम, फिरोज ढगे, रोहित पाटील, संदीप पाटील, अंबादास पेठकर, शेखर बोडरे, सुमित पाटील, प्रदीप पाटील, रवींद्र पाटील, अरुण कदम, एम. एस. पाटील, संजय पाटील, डॉ. संजय पाटील, जनरल मॅनेजर संजय दाभोळे उपस्थित होते.