शहरात गॅस पाइपलाइनसाठी प्रभाग क्रमांक ८,९,१०,१७ व १९ मध्ये खुदाई केली जाणार आहे. त्यापैकी ठेकेदाराकडून ७ कोटी रुपये भरून घेऊन खुदाईला मंजुरी देण्याचा विषय पटलावर होता. या विषयावरूनही सभेत प्रचंड गोंधळ झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी किमान १६ कोटी रुपये ठेकेदाराकडून भरून घ्यावेत, अशी मागणी केली. सभापती कोरे यांनी हा विषय मंजूर केला. त्याला विरोध करत आघाडीच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. सत्ताधारी भाजपने टक्केवारीसाठी या विषयाला मंजुरी दिल्याचा आरोप केला. हा आरोप कोरे यांनी फेटाळून लावला.
चौकट :
डमी सभापती कोण?
स्थायी समिती सभापती केवळ सूचना करतात. अधिकारी त्यांच्या सूचनांचे पालन करत नाहीत. सभेतही भाजपचे काही सदस्य सभापतींना सूचना देतात. तेच सभापती निर्णय घेतात. मग नेमके सभापती कोण? असा सवालही विरोधी सदस्यांनी उपस्थित करीत प्रशासनावर सभापतींचा वचक नसल्याचे सांगितले.
चौकट :
मिरज, कुपवाडसाठी नव्या शववाहिका
महापालिकेकडून दोन शववाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांच्या वाहनाचे आरटीओ पासिंगही झाले आहे. दोन दिवसात त्या कार्यान्वित होतील, असे सभापती कोरे यांनी सांगितले. मिरज आणि कुपवाड शहरासाठी या शववाहिका देण्यात येणार आहेत.