शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

‘शारीरिक शिक्षण’ डेंजर झोनमध्ये! तासिका केल्या कमी : विद्यार्थी मैदानापासून दुरावले; ग्रेड पध्दतीऐवजी गुणप्रक्रिया अवलंबण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:28 AM

हरिपूर : मन, मनगट आणि मेंदूचा विकास घडवणारा ‘शारीरिक शिक्षण’ हा विषय सध्या ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या विषयाकडे ‘टाईमपास’ म्हणून बघण्याच्या वृत्तीमुळे हा विषय शालेय

आदित्यराज घोरपडे ।हरिपूर : मन, मनगट आणि मेंदूचा विकास घडवणारा ‘शारीरिक शिक्षण’ हा विषय सध्या ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या विषयाकडे ‘टाईमपास’ म्हणून बघण्याच्या वृत्तीमुळे हा विषय शालेय वेळापत्रकातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे.शिक्षणासह विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, विद्यार्थी तंदुरूस्त बनावा, क्रीडा स्पर्धेचे व्यासपीठ त्याला खुले व्हावे, या उदात्त हेतूने अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षण हा विषय वेळापत्रात समाविष्ट आहे.

बदलत्या काळात या विषयाचे महत्त्व वाढण्याऐवजी कमी होत गेले. पूर्वी या विषयाला आठवड्याला पाच तासिका होत्या. पाचच्या चार आणि चारच्या दोन तासिका झाल्या. केवळ पस्तीस मिनिटांच्या दोन तासिका करून हा विषय हद्दपार करण्याचा घाटच जणू शासनाने घातला होता. शारीरिक शिक्षक संघटनेच्या आंदोलनामुळे आता किमान दोनच्या तीन तासिका झाल्या आहेत. मात्र त्या अपुºयाच पडतात. सध्या पाचवी ते आठवीला चार, तर नववी, दहावीला तीन तासिका दिल्या जातात.

इंग्रजी, गणित, भाषा विषयांच्या तुलनेत शारीरिक शिक्षणाला महत्त्वच दिले जात नाही. शारीरिक शिक्षणाच्या तासिका सर्रासपणे इतर विषयांसाठी वापरल्या जातात. त्यामुळे वेळापत्रकात हा विषय केवळ नामधारी म्हणून उरला आहे. याचे विपरित परिणाम विद्यार्थी व शारीरिक शिक्षकांवर होत आहेत. विद्यार्थी मैदानापासून दुरावला जात आहे. त्याचा शारीरिक विकास खुंटत चालला आहे. त्यामुळे लहान वयात विद्यार्थी आजारांना बळी पडत आहेत.

शारीरिक शिक्षकांच्या गळ्यात शाळाबाह्य कामांचे घोंगडे घातले जात आहे. शाळेतील स्नेहसंमेलन, सहली, प्रार्थना, वार्षिक पारितोषिक समारंभ अशा कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शारीरिक शिक्षकास राबवून घेतले जात आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षणाचा मूळ हेतू बाजूला राहत आहे. शाळेत मुलांचे मैदानावर खेळणे जवळपास बंदच झाले आहे. २०१२ पासून शिक्षक भरती बंद असल्याने अनेक शाळांत शिक्षकांच्या जागा रिक्तच आहेत. त्याचाही ताण शारीरिक शिक्षणावर येतच आहे.‘शारीरिक शिक्षण’ हा वेळापत्रकातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयाची लेखी परीक्षा घेऊन ग्रेडऐवजी गुण दिले, तर नक्कीच या विषयाचे महत्त्व वाढणार आहे. शारीरिक शिक्षकांना शालाबाह्य कामे न लावता त्यांना मैदानावरील उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे.- संजय नांदणीकर, (एम. व्ही. हायस्कूल, उमदी, ता. जत)शारीरिक शिक्षण विषयाची स्थिती ‘ना घर का... ना घाट का’ अशी झाली आहे. दिवसेंदिवस तासिका कमी होत चालल्या आहेत. आमचे अस्तित्वच जणू धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने या विषयाचे महत्त्व ओळखून न्याय द्यावा.- सखाराम पाटील, (देशभक्त निवृत्तीकाका पाटील विद्यालय, कुरळप, ता. वाळवा)1 शारीरिक शिक्षण विषयास ग्रेड (श्रेणी) ऐवजी गुण दिले जावेत.2 शारीरिक शिक्षणाच्या तासिकांची संख्या वाढवली पाहिजे.3 इतर विषयांसाठी शारीरिक शिक्षणाचे तास वापरू नयेत.4 रिक्त शिक्षकांची पदे त्वरित भरावीत.5 शारीरिक शिक्षकास शालाबाह्य कामे लावू नयेत.6 शारीरिक शिक्षण विषयाची लेखी परीक्षा व्हावी.8 शाळेत खेळाडू घडविण्यासाठी शारीरिक शिक्षकास संस्थेने प्रोत्साहन द्यावे.9 दहावी, बारावीच्या अंतिम गुणपत्रिकेत शारीरिक शिक्षण विषयाच्या गुणांचा समावेश व्हावा.10 क्रीडा स्पर्धा व मैदानावरील उपक्रमांना शाळेने पाठिंबा द्यावा.