माधवनगरजवळील नाकाबंदी नावाला
सांगली : माधवनगर जकात नाक्याजवळ पोलिसांनी छावणी उभारून तपासणीची औपचारिकता पार पाडण्यास सुरुवात केली आहे. दररोज पोलिसांचे बॅरिकेट्स ओलांडून हजारो वाहने संचारबंदीचा नियम मोडत ये-जा करीत आहेत. त्यामुळे नाकाबंदी नावालाच असल्याचे दिसत आहे.
सांगलीच्या सिव्हिल चौकात गर्दी
सांगली : येथील सिव्हिल चौकात दररोज सकाळी १० ते ११ व सायंकाळी वाहनांची गर्दी होत आहे. चौकातून राम मंदिराकडे जाणारा रस्ता सध्या बंद असल्याने हा चौक अरुंद बनला आहे. त्यातच परिसरातील अतिक्रमणांमुळे कोंडी होते.
सांगलीत मोसंबीची आवक घटली
सांगली : मागणी असूनही मोठ्या प्रमाणावर मोसंबीची आवक घटली आहे. त्यामुळे मोसंबीचे दरही वाढत आहेत. संत्र्यांची आवक मोठी आहे, मात्र माेसंबी मिळत नसल्याचे दिसत आहे. बाजारात मोजक्याच फळविक्रेत्यांकडे मोसंबी विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत.