लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज तालुक्यामध्ये मालगाव येथे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे गावात हायस्कूलमध्ये विलगीकरण केंद्रात बरे झालेले रुग्ण घरी परतताना त्यांना रोप भेट देण्यात आले.
सध्या गावात ५५ रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. शनिवारी ८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन सुभाषनगर, मालगाव येथील नवीन पाच रुग्ण व कर्नाटकातून एक रुग्ण दाखल झाला. गावातील एस.एम. हायस्कूल व महाविद्यालयात सुरू असलेल्या विलगीकरण केंद्रास ग्रामस्थांसह कृषी सेवा असोसिएशन, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, रक्तदाब तपासणी मशीन, पीपीई किट, धान्य व आर्थिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. तसेच मालगाव गावातील संस्था, संघटनांनी वैयक्तिक मदत केली.
विलगीकरण कक्षात ४२ पुरुष, २९ स्त्रिया आहेत. बरे झालेल्या रुग्णांना उपसरपंच तुषार खांडेकर यांच्याकडून पिंपळ व वड या दोन प्रकारच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच अनिता क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने, पंचायत समिती सदस्य काकासाहेब धामणे, ग्रामपंचायत सदस्य अजित भंडे, शशिकांत कनवाडे, कपिल कबाडगे, नीलेश सावंत, ॲड. पुष्पा शिंदे, गंगाधर यलपरटी, राजू माळी, झाकीर मुजावर, निप्पो परदेशी, ग्रामसेवक सुनील कोरे, तलाठी खरात उपस्थित होते.