सांगली : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, आदिंचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपवनसंरक्षक (प्रा.) प्रमोद धानके, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी बाळकिशोर पोळ यांच्यासह वन विभागाचे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.