शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

लग्नपत्रिकेच्या कागदात बियांचे रोपण : पत्रिकेचा लगदा करून वृक्षारोपण करण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:48 PM

मानाजी धुमाळ ।रेठरेधरण : तुळस व फुलांच्या बियामिश्रित कागदापासून रोपांच्या निर्मितीची अफलातून कल्पना प्रा. तेजस व प्रा. काजल या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवली आहे. स्वत:च्या लग्नपत्रिकेसाठी वापरण्यात आलेल्या कागदामध्ये तुळस व इतर फुलांच्या बिया रुजविण्यात आल्या आहेत. यातून त्यांनी ‘सेव्ह पेपर सेव्ह ट्री’ असा संदेश दिला आहे. त्यांच्या या पत्रिकेतील ...

ठळक मुद्देनवदाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम

मानाजी धुमाळ ।रेठरेधरण : तुळस व फुलांच्या बियामिश्रित कागदापासून रोपांच्या निर्मितीची अफलातून कल्पना प्रा. तेजस व प्रा. काजल या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवली आहे. स्वत:च्या लग्नपत्रिकेसाठी वापरण्यात आलेल्या कागदामध्ये तुळस व इतर फुलांच्या बिया रुजविण्यात आल्या आहेत. यातून त्यांनी ‘सेव्ह पेपर सेव्ह ट्री’ असा संदेश दिला आहे. त्यांच्या या पत्रिकेतील बीजाला अंकुर फुटून तुळस व फूलझाडांना हिरवीगार पालवी फुटणार आहे.

महे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले तेजस शंकर कांबळे यांचे शिक्षण एम. टेक्. झाले आहे, तर त्यांची नियोजित पत्नी काजल यांचे शिक्षण एम.एस्सी.पर्यंत झाले आहे. तेजस इस्लामपूरच्या आरआयटी. महाविद्यालयामध्ये, तर काजल न्यू लॉ कॉलेज (कोल्हापूर) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या दोघांचा विवाह रविवार दि. १३ मे रोजी होत आहे. या दोन विद्याविभूषित वधू-वरांच्या निसर्ग वाचविण्याच्या संकल्पनेतून ही बीजारोपण करणारी लग्नपत्रिका आकारास आली आहे.समाजाला चांगला संदेश देण्याच्या उद्देशाने तेजस यांनी पुणे येथे संपर्क साधून कापूस, तुळस व फुलांच्या बियांचे मिश्रण करून हाताने बनविलेला कागद औरंगाबाद येथून मागविला व ही लग्नपत्रिका कोल्हापूर येथे छापून घेतली.

या पत्रिकेचा आकार १९ सेंटीमीटर आहे. लग्नानंतर निमंत्रण पत्रिकेचा कागद पाण्यात दोन दिवस भिजवून त्या कागदाचा लगदा माती टाकलेल्या कुंडीमध्ये घालावयाचा आहे. त्यास थोडे थोडे पाणी दिल्यानंतर त्या कुंडीमधून तुळस व फुलांचे रोपटे उगवणार आहे. पाच महिन्यात त्याचे झाडात रूपांतर होणार आहे. याबाबतची सर्व माहिती लग्नपत्रिकेत चित्रासह रेखाटली असून यामधून ‘पेपर वाचवा निसर्ग वाचवा’ हा संदेश मिळत आहे.निसर्ग वाढीचा हेतूविद्यार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानाचे धडे देणाऱ्या तेजस व काजल यांची, लग्नपत्रिकेच्या कागदापासून निसर्गाची वाढ करण्याच्या हेतूने बीजांच्या निर्मितीची संकल्पना समाजाला नवीन दिशा दाखविणारी ठरत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न