सांगली : रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांची समस्या जितकी गंभीर आहे, तितकीच किंवा त्याहूनही अधिक गंभीर प्रश्न अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळांचा (पॅथॉलॉजी लॅबोरेटरी) आहे. जिल्ह्यात तब्बल ८० हून अधिक लॅब बोगस असल्याची तक्रार पॅथॉलॉजी ॲण्ड मायक्रो बायोलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. जतमध्ये एका लॅबवर केलेली कारवाई हा अशा प्रयोगशाळांचे दुकान जिल्ह्यात जोमाने सुरु असल्याचा पुरावाच आहे.बोगस डॉक्टरांप्रमाणेच बोगस प्रयोगशाळांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात या प्रयोगशाळांचे प्रयोग अधिक प्रमाणात सुरु झाले. कोरोना काळ संपला तरी अजून अशा प्रयोगशाळा कार्यरत आहेत. बेमालूमपणे हा उद्योग सुरु आहे.वैद्यकीय व्यवसाय असेल, तर रितसर परवाना हवा
- लॅबोरेटरी चालवून वैद्यकीय रिपोर्ट रुग्णांना वितरित करणे हा वैद्यकीय व्यवसाय आहे.
- महाराष्ट्र वैद्यक व्यावसाय अधिनियम १९६१ नुसार वैद्यकीय व्यवसायासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, आयुर्वेदिक कौन्सिल, होमिओपॅथी कौन्सिल किंवा डेंटल कौन्सिलला नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
- नोंदणी नसल्यास अधिनियमांतर्गत कलम ३३ नुसार गुन्हा दाखल होतो व त्यानुसार कारवाई केली जाते.
सर्वोच्च न्यायालय काय सांगते ?सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार वैद्यकीय अहवाल (लॅबोरेटरी रिपोर्ट) नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टने स्वाक्षरी करुन देणे बंधनकारक आहे. असे असताना बोगस प्रयोगशाळा सुरु असणे धक्कादायक आहे....तर दहा वर्षे कारावासपहिल्या अपराधासाठी २ ते ५ वर्षे व २ ते दहा हजारापर्यंत दंड, तर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी दहा वर्षांपर्यंत कारावासाची आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा लागू आहे.