शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महापौरांच्या अर्ज वैधतेबाबत हायकोर्टात याचिका तीन अपत्यांबाबत आक्षेप : छाननीवेळी उमेदवारी ठरली होती वैध- सांगली महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 9:45 PM

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविल्यानंतर शुक्रवारी तक्रारदार आसिफ बावा यांनी मुंबई उच्च न्यायालयात

सांगली : महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविल्यानंतर शुक्रवारी तक्रारदार आसिफ बावा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांची तीन अपत्यांबाबतची तक्रार फेटाळण्यात आली होती. दुसरीकडे मिरजेत माजी महापौर विवेक कांबळे, संगीता खोत, गणेश माळी या भाजपच्या तिघांविरोधातील हरकत फेटाळण्यात आली. याविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे. उमेदवारी अर्जावरून आता कोर्टबाजी सुरू झाली आहे.

महापालिकेच्या प्रभाग १६ मधून महापौर शिकलगार यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे. गुरुवारी अर्ज छाननीवेळी शिकलगार यांच्या अर्जाला बावा यांनी आक्षेप घेतला. शिकलगार यांना तिसरे अपत्य असल्याचे पुरावे गोळा केले होते. वसंतदादा शासकीय रुग्णालयाकडून त्यांच्या नावे मुलीचा जन्म झाल्याची महापालिकेकडे नोंद झाल्याचा दावा करीत कागदपत्रे सादर केली.

महापालिकेत मुलीऐवजी मुलगा असे नाव जन्म-मृत्यू कार्यालयात नोंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर २००९ मध्ये त्यामध्ये दुरुस्ती करून मुलगी असे करण्यात आल्याचा दावाही बावा यांनी केला. त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये हे प्रकरण अंगलट येत असल्याने शिकलगार यांनी महापौर पदाच्या अधिकाराचा गैरवापर करीत त्यात दुरुस्ती करून स्वत:चे नाव काढल्याचाही आरोप केला.

यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवावा, अशी मागणी केली होती. यावेळी शिकलगार यांच्याबाजूने अ‍ॅड. राजू नरवाडकर आणि अ‍ॅड. मुमताज जमादार यांनी बाजू मांडली. त्यांनी शिकलगार यांच्या अर्जावर घेतलेले आक्षेप फेटाळून लावले. बावा यांनी दिलेले पुरावे खोटे असल्याचा दावा केला. ज्या अपत्याबाबत बावा यांनी दावा केला आहे, त्याच्याशी आणि संबंधित महिलेशी शिकलगार यांचा काहीच संबंध नसल्याचा दावा करीत त्याचे पुरावे सादर केले.

अखेर निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन महापौरांचा अर्ज वैध ठरविला होता. यामुळे महापौरांना दिलासा मिळाला होता. शुक्रवारी बावा यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती ओक व न्यायमूर्ती छागला यांच्या खंडपीठासमोर दावा दाखल केला. यात निवडणूक अधिकाºयांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. यावर आता सोमवारी सुनावणी होणार असून न्यायालयाने संबंधितांना नोटिसाही बजाविल्याचे बावा यांनी सांगितले.कांबळे, खोत, माळींचे अर्ज वैधमहापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीत भाजपचे विवेक कांबळे, संगीता खोत, गणेश माळी यांच्या उमेदवारीला घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी फेटाळून लावली. निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या या निर्णयाविरोधात राष्टÑवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रभाग सातमधील भाजप उमेदवार संगीता खोत या मजूर सोसायटीच्या संचालक, ठेकेदार असल्याची व भाजप उमेदवार गणेश माळी महापालिकेचे ठेकेदार असल्याची व प्रभाग वीसमध्ये भाजपचे उमेदवार विवेक कांबळे यांनी अतिक्रमण केल्याच्या हरकतीवर गुरूवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी शुक्रवारी दुपारी यावर निर्णय दिला. हरकती घेतलेल्या भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणCourtन्यायालय