पंतप्रधानांचा मुंबई दौरा उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:45 PM2023-01-20T19:45:34+5:302023-01-20T19:47:31+5:30

विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही

PM Narendra Modi Mumbai visit to target Uddhav Thackeray, NCP leader Ajit Pawar criticized | पंतप्रधानांचा मुंबई दौरा उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची टीका

पंतप्रधानांचा मुंबई दौरा उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची टीका

googlenewsNext

दत्ता पाटील

तासगाव : पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका  निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी होता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पार्थ पवार आणि मंत्री शंभूराजे देसाई यांच्या भेटीबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, मला अनेक नेते येऊन भेटायचे,  मी पण अनेक मंत्र्यांना जाऊन भेटलो. विकास कामाविषयी जर चर्चा होत असते. आमचे पक्ष आणि विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेका बद्दल टिकात्मक भाषण करायचे. पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपली ती संस्कृती आहे.

अंजनीत निर्मलस्थळी झाडे लावा  

अंजनी  येथे स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या निर्मलस्थळ स्मारकाच्या ठिकाणी झाडे लावावीत म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. आर.आर. पाटील यांच्या निर्मलस्थळ भोवती कंपाउड उभारले. पण झाडे का लावली नाहीत म्हणून अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी झाले लावण्याच्या सूचना केल्या.

Web Title: PM Narendra Modi Mumbai visit to target Uddhav Thackeray, NCP leader Ajit Pawar criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.