फोटो २६ सांगली ०१
सांगलीत कवी खलील मोमीन यांच्यासमवेत मुक्त संवाद मैफिलीत संजय पाटील, वर्षा चौगुले, मनीषा पाटील, प्रतिभा जगदाळे, अभिजित पाटील आदी सहभागी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शब्दसाहित्य विचारमंचातर्फे प्रसिद्ध कवी, गझलकार खलील मोमीन यांच्याशी साहित्य संवाद आयोजित करण्यात आला. मराठी कवितेचा इतिहास आणि वर्तमान कविता यांच्यामधील स्थित्यंतरे, कवितेच्या भाषेचे सौंदर्य, शब्दांची निवड, कवितेचा आशय, गझलेतील मात्रा, छंदोबद्ध कविता, मुक्तछंद, बदलती ग्रामीण कविता, दलित कविता, निसर्ग कविता इत्यादी विषयांवर मुक्त संवादाची मैफल रंगली. यामध्ये संजय पाटील, साहील शेख, वर्षा चौगुले, मनीषा पाटील, प्रतिभा जगदाळे आदींनी सहभाग घेतला. मोमीन म्हणाले की, कवींनी कवितेचा शोेध अखंड सुरू ठेवला पाहिजे. त्यामध्ये उत्स्फूर्तता हवी. कृत्रिम साज चढविलेली कविता रसिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही. स्वानंदासाठी लिहिलेली कविता समाजमान्यताही मिळविते. हलक्याफुलक्या शब्दांच्या वापराने मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. मानवी भावना व्यक्त करण्याचे ती सर्वाधिक चांगले साधन आहे. संयोजन दयासागर बन्ने, अभिजीत पाटील, रमजान मुल्ला, सचिन पाटील, महादेव माने, सुधीर कदम यांनी केले.
------------