शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

सुयोग औंधकरसह साथीदारास पोलीस कोठडी-खंडणीचे प्रकरण : तक्रारींचा ओघ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:30 PM

येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक अमोल डफळे यांच्याकडून १0 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना येथील न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही

ठळक मुद्देआणखी गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता

इस्लामपूर : येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक अमोल डफळे यांच्याकडून १0 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना येथील न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही खंडणीखोरी उघडकीस आणल्यानंतर, औंधकर व जंगमच्या विरोधात खंडणीच्या तक्रारींचा ओघ सुरु झाला आहे.संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (वय ४0, रा. कासेगाव) आणि माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा विश्वनाथ जंगम (५५, वाळवा) यांना खंडणीप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी बाजार समिती आवारातील सहायक निबंधक कार्यालयातच पकडण्यात आले होते.

वाळवा येथील हुतात्मा सह. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जांची प्रसिध्दी नोटीस फलकावर का जाहीर केली नाही, असे क्षुल्लक कारण पुढे करत औंधकर आणि जंगम अशा दोघांनी सहायक निबंधक डफळे यांना ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. जानेवारी १७ ते जानेवारी १९ अशी २ वर्षे या दोघांचा हा उपद्व्याप सुरु होता. शेवटी १0 लाखांची खंडणी मागत कार्यालयातच जाऊन ती स्वीकारण्याचे धाडस करणाºया औंधकरच्या मुसक्या पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे यांनी आवळल्या.

औंधकर व जंगमविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्याचे अनेक कार्यालयांतील खंडणीखोरीचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्यांच्या या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून काही नावे निष्पन्न झाल्याचे पिंगळे यांनी स्पष्ट केले. येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही औंधकरने खंडणीची मागणी केली होती. वाळवा येथील ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिकाकडे १५ लाखांची खंडणी मागितल्याची चर्चा आहे. पण यासंदर्भात तक्रार दाखल झाली नाही. इस्लामपूरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनाही त्याने खंडणी मागितल्याचे समजते.या सर्व प्रकरणात औंधकर आणि त्याच्या साथीदारांविरुध्द इस्लामपूर आणि आष्टा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद घेण्याचे काम सुरु होते.औंधकर-जंगमाचा संघटनाकडून निषेधसंभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सुयोग औंधकर व माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा जंगम यांना खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर वाळवा तालुक्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व इतर हिंदुत्ववादी संघटनांसह मुस्लिम समाज संघटनेच्यावतीने दोघांचा निषेध करण्यात आला. या दोघांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशा भुरट्या कार्यकर्त्यांना शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी अनिल वाळवेकर, सचिन पाटील, जयसिंग बेनाडे, संतोष सपाटे, इब्राहीम मुजावर यांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली