शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

पोलीस फौजदार चौधरी निलंबित

By admin | Published: July 12, 2015 11:19 PM

खातेनिहाय चौकशी : गोवा वारी आली अंगलट

सांगली : तपासासाठी केलेली गोव्याची वारी एका पोलीस फौजदाराच्या चांगलीच अंगलट आली आहे. संभाजी चौधरी असे या फौजदाराचे नाव आहे. गोव्यात तपासाला जाताना कोणतीही परवानगी न घेतल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ते जत पोलीस ठाण्यातील नियुक्तीस होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही फुलारी यांनी दिले आहेत.जतमधील एक अल्पवयीन मुलगी पळवून नेण्यात आली होती. त्याचा तपास चौधरी यांच्याकडे होता. ही मुलगी संशयित तरुणासोबत गोव्यात असल्याची माहिती मिळताच चौधरी स्वत: गोव्याला गेले होते. तिथे पुढील कार्यवाही करताना त्यांनी खाकी गणवेश पिशवीत घातला होता. साधा गणवेश घालून ते संशयितास पकडण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांनी तेथील गोवा पोलिसांची मदत घेतली नाही.चौधरी यांनी आपण पोलीस फौजदार असल्याचे ओळखपत्र दाखविले होते. तरीही कारवाईदरम्यान त्यांचा वाद झाल्याने गोवा पोलिसांनी पोलीसप्रमुख फुलारी यांच्याशी संपर्क साधला होता. फुलारी या प्रकणाची चौकशी केली असता, चौधरी यांनी तपासाला जाताना कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजले. चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)निलंबित अन् पदोन्नतीचौधरी यांना आठवड्यापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. त्याचदिवशी त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीवर त्यांची जिल्ह्याबाहेर बदलीही होणार होती. पण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने पदोन्नतीसह पुढील सर्व प्रक्रिया थांबली आहे.