लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन केले. लॉकडाऊनच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी चिल्लावार यांनी केले.
या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने बुधवारी रात्रीपासून पंधरा दिवस पुन्हा आदेश दिले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिराळा शहरातून पोलिसांनी संचलन करून नागरिकांना सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमावलीचे लोकांनी काटेकोर पालन करावे. कुणीही विनाकारण फिरल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.