लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे बुधवारी रात्री आठपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाभर पोलिसांनी संचलन केले. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
कोरानाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी रात्री आठपासून पुढील १५ दिवस संचारबंदी आदेश लागू करत कडक निर्बंधही लागू केले आहेत. त्यानुसार, संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने संचलन करत, संचारबंदीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दुबुले यांनी कुपवाड शहरातील पोलीस संचलनात सहभागी होत मास्क वापरण्याचे आवाहन केले.
चौकट
आजपासून कडक कारवाई
गुरुवारपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश दिले आहेत.