सचिन लाडलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पोलीस कर्मचाऱ्यांना दरमहा २० रुपये विशेष कर्तव्य भत्ता गृह विभागाने मंजूर केला आहे. प्रत्येक महिन्याच्या पगारातून हा भत्ता देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत. पुढील महिन्यापासून जिल्हा पोलीस दलात या नव्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अवघा २० रुपये भत्ता मंजूर करुन शासनाच्या गृह विभागाने एकप्रकारे पोलिसांची चेष्टा केली आहे. या निर्णयामुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे.पोलीस म्हटले की, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही वेगळाच आहे. ‘खाकी’ वर्दीतील या पोलिसांना पगाराची काय गरज? वरकमाई बक्कळ असते, अशी नेहमीच चर्चा होते. त्यामुळेच की काय, शासन त्यांना तटपुंजे भत्ते देत आहे. पोलीस शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार या पदावर काम करणाºया पोलिसांना आहार भत्ता, धुलाई भत्ता, वाहनभत्ता व ओव्हरटाईम भत्ता दिला जातो. अन्य शासकीय कर्मचाºयांच्या तुलनेत हे भत्ते कमी आहेत. भत्ते वाढवून देण्यासाठी पोलिसांची नेहमीच ओरड असते. पण पोलिसांची संघटना नसल्याने त्यांची ताकद कमी पडते. परिणामी आहे त्या भत्त्यावर समाधान मानून काम करावे लागत आहे. सुटीदिवशीही अनेकदा कामावर बोलाविले जाते. परंतु त्याचा भत्ता दिला जात नाही. पर्यायी सुटी देतो, असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यायी सुटी दिली जात नाही.गृह विभागाने ९ मार्च २०१८ रोजी लेखी आदेशाद्वारे पोलीस कर्मचाºयांना त्यांचा दरमहा २० रुपये विशेष कर्तव्यभत्ता वेतनामधून देण्याचा आदेश दिला आहे. हा लेखी आदेश राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना प्राप्त झाला आहे. त्याची अंमलबजावणी सुरुही झाली आहे.
वीस रुपयांच्या भत्त्यातून पोलिसांची चेष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:43 AM
सचिन लाड लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पोलीस कर्मचाऱ्यांना दरमहा २० रुपये विशेष कर्तव्य भत्ता गृह विभागाने मंजूर केला आहे. प्रत्येक महिन्याच्या पगारातून हा भत्ता देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत. पुढील महिन्यापासून जिल्हा पोलीस दलात या नव्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अवघा २० रुपये भत्ता मंजूर करुन शासनाच्या गृह विभागाने एकप्रकारे पोलिसांची चेष्टा केली आहे. या निर्णयामुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे.
ठळक मुद्देगृह विभागाचा आदेश : विशेष कर्तव्य भत्ता केवळ वीस रुपये; पोलिसांमध्ये नाराजी