शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

इस्लामपुरातील राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर-सोशल मीडियावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:16 AM

इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत.

ठळक मुद्देएकमेकांची उणी-दुणी काढण्यास सरसावले दोन्ही गटातील कार्यकर्ते

अशोक पाटील ।इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत. याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्येही उमटू लागले आहेत. त्यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे.काँग्रेस आघाडीचे सरकार गेल्यानंतर पाटील यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी देऊन राष्ट्रवादीने त्यांचा सन्मान केला आहे. भाजपची सत्ता आली आणि शेतकरी चळवळीतील नेते सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाले. याबद्दल पाटील यांनी खोत यांचा सन्मानही केला. परंतु अलीकडील काही महिन्यात खोत आणि काही भाजपमधील नेत्यांनी राष्टÑवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले. यामुळे खोत आणि पाटील यांच्यातील मतभेद वाढत गेले.दिलीप पाटील यांनी नुकत्याच झालेल्या हल्लाबोल यात्रेत खोत यांचा खरपूस समाचार घेतला. याला खोत आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर दिले. मात्र या दोघांमधील आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे.मधील काळात मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत यांनी राष्ट्रवादीच प्रथम क्रमांकाचा शत्रू मानून आ. जयंत पाटील यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खतपाणी घातले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून खोत यांनी शक्तिप्रदर्शन केले. तेथेही आ. पाटील यांनाच टार्गेट केले जात होते. याचा राग आ. पाटील यांचे समर्थक दिलीपतात्या पाटील यांनी हल्लाबोल यात्रेत काढला. आता पाटील आणि खोत यांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन हल्लाबोल यात्रेच्या गर्दीवरून टोमणे मारले.दिलीपतात्या पाटील यांनाही टार्गेट केले. आता दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे. पाटील यांचे पुत्र क्रांतिप्रसाद यांनी सोशल मीडियावरून प्रसाद पाटील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. शिवाय रयत क्रांती संघटनेचे गणेश शेवाळे यांचाही समाचार घेतला आहे.सभेच्या गर्दीवरून सुरू झाले युद्धसदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास गर्दी व्हावी, यासाठी बाहेरील लोक आयात केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्याचा वचपा म्हणून हल्लाबोल यात्रेतील गर्दी पाहून हे लोक बाहेरून आणल्याचा पलटवार खोत यांच्या समर्थकांनी केला. यातूनच सध्या सोशल मीडियावर ‘हल्लाबोल’ सुरू झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण