शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

Sangli: बाळासाहेब, आम्हाला सांगली केसरी बनवून, तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हा!; कुस्ती आखाड्यात नेत्यांची जुगलबंदी अन् टोलेबाजी

By हणमंत पाटील | Published: January 25, 2024 3:42 PM

'तुमच्या दोघांच्या नादात मी माझा अपघात होऊ देणार नाही'

सांगली : तुम्ही राजकारणातील महाराष्ट्र केसरी व्हा अन् तुमच्या आशीर्वादाने आम्हाला सांगली केसरी होऊ द्या, असे आवाहन खासदारकीसाठी इच्छुकांनी केले. त्यावर तुमच्या दोघांच्या नादात मी माझा अपघात होऊ देणार नाही. डावीकडे व उजवीकडे न पाहता गाडी सरळ चालविणार अशी टोलेबाजी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली.येतगाव (ता. कडेगाव) येथे सरपंच अर्जुन कापसे यांनी कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवारी भरविले होेते. मैदानाच्या आखाड्यातच माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, लोकसभेसाठी इच्छुक कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यात राजकीय जुगलबंदी व टोलेबाजी चांगलीच रंगली. त्याला हसून दाद देत कुस्तीच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद घेतला.कुस्तीच्या मैदानावरील मंचावर बाळासाहेबांच्या (डॉ. विश्वजित कदम) उजव्या (चंद्रहार पाटील) व डाव्या बाजूला (विशाल पाटील) हे दोन्ही पैलवान बसल्याची पहिली टिप्पणी जितेश कदम यांनी मनोगतात केली. त्यावर शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून पैलवान चंद्रहार लोकांना भेटून त्यांच्या कामासाठी पुढे येत आहे. कारण आताचा खासदार बिनकामाचा आहे म्हणून ते लोकसभेसाठी इच्छुक झाले आहेत. बाळासाहेब, तुम्ही पैलवान व माझ्या कोणाच्याही पाटी उभे राहा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. या मंचावरचा एक माणूस निश्चित खासदार होणार, असा विश्वास विशाल पाटील यांनी भाषणात व्यक्त केला. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

माझी गाडी धडकवायची नाही..‘डॉ. विश्वजित कदम या भावी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मंचावर उपस्थित आहोत. बाळासाहेब, तुमच्या उजव्या बाजूला पैलवान आणि डाव्या बाजूला मी बसलो आहे. आता तुम्ही डावीकडे बघा की उजवीकडे आम्ही तुमच्याबरोबरच आहोत,’ असे विशाल पाटील यांनी आश्वस्त केले. आता उजवीकडे बघायचे की डावीकडे हे मलाच कळेना. मी शिकलोय, गाडी चालविताना इकडे तिकडे बघायचं नसतं, सरळ बघायचं असतं. नाहीतर गाडी धडकते. मला तुमच्या नादात माझी गाडी धडकवायची नाही. कारण दोन्ही पैलवान तेल लावलेले आहेत, अशी टोलेबाजी बाळासाहेबांनी केली. त्यावर बोलताना चंद्रहार पाटील यांनी आणखी राजकीय कडी केली. ते म्हणाले, ‘काही हरकत नाही बाळासाहेब, आम्हाला सांगली केसरी बनवून, तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हा.’

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकVishwajeet Kadamविश्वजीत कदम