शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

कृष्णा प्रदूषित अन् वारणेचे पाणी पेटले; सांगलीत पाण्यावरून राजकारण 

By अविनाश कोळी | Published: December 08, 2023 4:47 PM

दीर्घकालीन योजनांची महापालिकेला ॲलर्जी

अविनाश कोळीसांगली : कृष्णा नदीला सांडपाण्याच्या प्रदूषणाचे ग्रहण जितके जुने आहे. तितकेच पाणी प्रश्नातल्या राजकीय प्रदूषणाची परंपरा कायम आहे. त्यानुसार सांगलीसाठी आखल्या जाणाऱ्या पर्यायी पाणीपुरवठा योजनेवरून आता राजकारण रंगले आहे. दीर्घकालीन विचार करून ठोस योजना आखणे. ती मुदतीत पूर्ण करणे महापालिकेला आजवर कधीही जमलेले नाही. तांत्रिक व राजकीय अडथळे पार करत कोणतीही योजना पूर्णत्वास न गेल्याने वारणा नदीतून पाणी उचलण्याचा घाट घातला जातोय.सध्या कृष्णा नदीत शेरीनाला जिथे मिसळतो. त्याच्यापासून काही अंतर उत्तरेला महापालिकेचे पाणी उपसा केंद्र आहे. नदीच्या पाण्याची तपासणी सातत्याने होत असते. प्रदूषित पाण्यामुळे सांगलीच्या पाणी योजनेला पर्याय हवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यायी योजनेची चर्चा सुरू आहे. दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ता काळात महापालिकेने वारणा उद्भव योजना आखली होती. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ही योजना गुंडाळली होती. आता नव्याने पर्यायी योजनेची चर्चा पुढे आली आहे. सर्वपक्षीय चर्चासत्रात सर्वच नेत्यांचे सूर जुळले, मात्र अल्पावधीत सोयीच्या राजकारणाने योजनेला ग्रासले आहे.

अशा आहेत पर्यायी योजना?कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमापासून एक किलोमीटरवर पश्चिमेकडे सांगलीवाडी हद्दीतून वारणेचे पाणी उचलून ते सांगली व कुपवाडला देण्याची योजना आहे. ही योजना २३० कोटी रुपयांची असेल.चांदोली धरणातून थेट पाइपलाइन टाकून सांगली व कुपवाडला पाणी पुरवठा करण्याची दुसरी योजनाही सध्या चर्चेत आहे. अंदाजे १०० किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या या योजनेसाठी महापालिका अधिकाऱ्यांच्या मते १२०० कोटी रुपयांचा खर्च होईल.

म्हणून वारणा नदीतून पाणी उचलण्यास विरोधस्थानिक सामाजिक संघटनांनी चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला पसंती दर्शविली आहे. हरिपूरजवळून पाणी उचलण्याच्या योजनेला प्रदूषणामुळे विरोध होत आहे. म्हैसाळ येथे कृष्णा नदीत बॅरेज उभारण्यात येणार आहे. यामुळे त्याचे बॅकवॉटर दानोळीपर्यंत येणार आहे. दुसरीकडे कृष्णा नदीत सांगलीतून तब्बल ५६.२५ दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज नदीत मिसळते. त्यामुळे हरीपूरपर्यंतच्या पात्राला गटाराचे स्वरूप प्राप्त होते. बॅरेजच्या बॅकवाॅटरमुळे वारणेच्या पात्रालाही प्रदूषणाचा फटका बसणार आहे. त्यामुळे या योजनेतून पुन्हा दूषित पाणीच नागरिकांच्या वाट्याला येईल म्हणून विरोध केला जात आहे.

श्रेयवादाचे राजकारण रंगणारड्रेनेजच्या योजनेप्रमाणेच सांगलीच्या पर्यायी पाणी योजनेमध्ये राजकारणाने शिरकाव केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू राहणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीpollutionप्रदूषण