शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक : इरोम शर्मिला, इस्लापूर येथे जीवन गौरव पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:36 AM

यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक : इरोम शर्मिला इस्लापूर येथे जीवन गौरव पुरस्काराने गौरव

इस्लामपूर : यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला.

विशेष कायद्याच्या नावाखाली सशस्त्र दलाच्या जवानांकडून निर्दोष लोकांचे बळी घेतले जात होते. मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात होती. माझ्यासह तरुण पिढीबरोबर जे घडत होते, त्याचा राग होता. म्हणून तब्बल सोळा वर्षे उपोषण केले. राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक बनले आहे. या काळात समाजाची साथ नव्हती आणि सरकारकडून माझा आवाज दडपला जात होता. मात्र त्याची मला खंत वाटत नाही,  असे त्या म्हणाल्या.येथील आधार हेल्थ केअर या आरोग्य सेवेचा दुसरा वर्धापन दिन इरोम चानू यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी वाटेगाव (ता. वाळवा) येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. शिवलिंग बने यांना इरोम चानू यांच्याहस्ते ह्यजीवन गौरवह्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सतीश गोसावी अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शर्मिला यांचे पती कुटी न्हो, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्रा. चर्चिल सॅमसंग, नगरसेवक संजय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आधारचे प्रमुख डॉ. योगेश वाठारकर, डॉ. ज्योती वाठारकर, डॉ. पवनसिंह नायकल-पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.येथील कोरेअप्पा नगरमधील माणकेश्वर मल्टिपर्पज हॉलमध्ये इरोम चानू शर्मिला यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, सशस्त्र दलाच्या जवानांकडून निर्दोेष लोकांचे बळी घेतले जात होते. त्यामुळे या अन्यायी कायद्याविरुद्ध सोळा वर्षे लढा दिला होता. या कालावधित जे राज्यकर्ते होते, ते दिल्लीच्या तालावर कठपुतलीसारखे काम करणारे होते.

माझ्या लढ्याची त्यांच्याकडून दखल घेतली जात नव्हती. माझे समर्थक माझा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनाही दडपले जायचे; मात्र तरीही महात्मा गांधींच्या प्रेरणेने संघर्षात एकाकी पडूनसुद्धा सोळा वर्षे मी लढत राहिले, याचा मला अभिमान वाटतो.इरोम शर्मिला म्हणाल्या, आपण फक्त राजकारणातील वाईट प्रवृत्तींबद्दल बोलतो, लोकप्रतिनिधींविरुद्ध बोलतो; मात्र त्याचवेळी आपल्या इच्छेविरुद्ध काही घडत असताना लोक बोलत नाहीत, त्यामुळे समाजही तितकाच दोषी ठरतो. राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक बनले आहे.

पाण्याचा थेंब तोंडात न घेता सोळा वर्षे मी जगू शकते. त्यामुळे माझ्या जनतेच्या पाठिंब्यावर आणि बळावर मणिपूरची मुख्यमंत्रीही बनू शकते, असा विश्वास वाटत होता. पण निवडणुकीच्या राजकारणासाठी येथेही पदरी निराशा पडली.

आणखी वाचानिवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार

इरॉम शर्मिला अखेर आज 16 वर्षांनी इरॉम शर्मिलांचे उपोषण संपणारस्वत:ची ओळख निर्माण करताना प्रत्येकाने मानवतेचा विचार करायला हवा. कुटुंब आणि समाजात प्रेमाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. वाईट प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करताना एकटे राहावे लागते, याची जाणीव ठेवायला हवी. नव्या पिढीतील मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे, पदव्या घ्याव्यात, मात्र समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो, ही भावना मनी बाळगली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक सी. पी. पाटील, डॉ. अमृत पाटील, उद्योजक एस. आर. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, माजी मुख्याध्यापक नि. रा. हिणवार, प्रवीण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. सुनील पाटील यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयSangliसांगली