गजानन पाटीलसंख : निर्यात बंदी, पाऊस यामुळे डाळिंबाचे दर गडगडल्याने जत तालुक्यातील डाळिंब उत्पादक अडचणीत आला आहे. मालाला बाजारात उठावच नाही, त्यातच लहान फळे असलेल्या बागांवर चिक्की, बिब्ब्या (तेल्या डाग) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बागेवर केलेला खर्चसुद्धा निघणार नसल्याचे चित्र आहे.
जत तालुक्यातील डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. खडकाळ जमीन, अनुकूल हवामान, कमी पाणी यामुळे क्षेत्रात वाढ झाली आहे. ठिबक सिंचन, शेततलाव, फळबाग अनुदान योजनेतून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, सोन्याळ, जाडरबोबलाद, जालिहाळ खुर्द, उमदी, दरीकोणूर या परिसरात दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.
इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये डाळिंबाचे उत्पादन येते.यावर्षी अनुकूल हवामान, जुलै, आॅगस्ट महिन्यात झालेला पाऊस यामुळे झाडाला फुले चांगली आली. फळांची अपेक्षित वाढ झाली. मात्र नंतर सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतात पाणीच पाणी झाले. बागेत पाणी साचून राहिल्यामुळे फळे गळून पडली, कुजून गेली. यावर्षी मे महिन्यात पाणी नसल्यामुळे बागा कमी होत्या. जुलै-आॅगस्टमध्ये बाजारात आवक कमी असल्यामुळे गणेश जातीच्या डाळिंबाला ४० ते ५५ रुपये किलो दर होता, तर भगवा डाळिंबाला ६० ते ७० रुपये दर मिळत होता.
उशिरा फळधारणा झालेल्या व नोव्हेंबरमध्ये विक्रीला येणाºया डाळिंबाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता. पण निर्यात बंदी, तसेच चेन्नई येथे सुरू असलेला पाऊस यामुळे दरात घसरण झाली आहे. सध्या बाजारात गणेश डाळिंबाला ५ ते २० रुपये किलो असा दर आहे, तर भगवा डाळिंबाला ३० ते ४५ रुपयांपर्यंत दर आहे. गणेश डाळिंबाला बाजारात उठावच नाही.केंद्र शासनाने डाळिंबावर निर्यातबंदी घातली आहे. त्याचाही फटका डाळिंब व्यापाराला बसला आहे.गणेश डाळिंबाच्या बागा काढण्याची वेळशेतकºयांच्या जुन्या बागा गणेश जातीच्या आहेत. चांगले उत्पादन, कमी खर्च, झाडाची उत्तम प्रतिकारशक्ती यामुळे गणेश डाळिंब बागा लावण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. पण बाजारात त्याला उठावच नाही. व्यापारी माल नको म्हणत असल्याने, दर कमी झाला आहे. त्यामुळे गणेश डाळिंबाच्या बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे.
डाळिंब जात सध्याचे दर आॅगस्ट-सप्टेंबरचे दरगणेश ५ ते २० रुपये (किलो) ४० ते४५भगवा ३० ते ३५ रुपये ६० ते ७० रुपये
जत तालुक्यातील डाळिंबाचे दर कमी झालेले आहेत. महागडी औषधे, रासायनिक खते व मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे. कमी दरामुळे हा खर्चसुद्धा निघणे मुश्किल आहे. शासनाने लक्ष घालून बागायतदारांना दिलासा द्यावा.- आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी