शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

पोपटराव पवार यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार

By admin | Published: January 10, 2017 11:22 PM

पोपटराव पवार यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार

सांगली : येथील शांतिनिकेतनमधील प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने दिला जाणारा ‘कर्मयोगी पुरस्कार’ यंदा हिवरे बाजार (जि. अहमदनगर) येथील आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना जाहीर झाला. एक लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, रविवारी (दि. १५) शांतिनिकेतन परिसरात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे, अशी माहिती सोशल फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.थोरात म्हणाले की, समाज परिवर्तनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने ‘कर्मयोगी पुरस्कार’ देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यंदा जलसंधारण आणि ग्रामस्वराज्य क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना गौरविण्यात येणार आहे. पावसाचे पाणी आणि उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पवार यांनी गाव हिरवेगार केले आहे. ऊस आणि केळी यासारखी पिके बंद करण्याचे धाडसही तेथील गावकऱ्यांनी दाखविले आहे. त्याऐवजी फूल शेती आणि भाजीपाला पिके घेण्याबाबत पवार यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. परिणामी गावातील दरडोई उत्पन्न ८३२ रुपयांवरून ३२ हजार रुपयांवर पोहोचले आहे. गावाचे आर्थिक उत्पन्न सुधारलेच, त्याचबरोबर दुष्काळातूनही सुटका मिळाली. निरक्षरता, जंगलतोड, व्यसनाधीनता, अस्वच्छता, दारिद्र्य, लिंगभेद, प्रदूषण या प्रश्नांवरही गावामध्ये जनजागृती झाली आहे. पवार यांच्या कार्याची आणि हिवरे बाजारची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली आहे. स्टॉकहोम येथील विद्यापीठात आणि ब्रिटिश लायब्ररीमध्ये हिवरे बाजारची यशोगाथा दाखवली जाते. यापूर्वी विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.दि. १५ जानेवारीला शांतिनिकेतन येथे जिल्हाधिकारी श्ेखर गायकवाड यांच्याहस्ते आणि ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. याच कार्यक्रमात ‘माई’ पुरस्काराने राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका समिता गौतम पाटील आणि कलाविश्व महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल व माई भोजनालयाचे व्यवस्थापक भीमराव पाटील यांचाही गौरव करण्यात येणार आहे.