सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त आहे. तेथे त्वरित नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी रिक्षा युनियनने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. डोळ्यांना काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध केला.आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपप्रादेशिक परिवहन भरावे यासाठी यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आहेत. या कार्यालयात जिल्हाभरातून दररोज शेकडो लोक येतात. पण कार्यालय प्रमुख नसल्याने त्यांना त्रास सोसावा लागतो. हेलपाटे मारावे लागतात. पण याचे गांभीर्य कोणालाच नाही. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत नियुक्ती केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल.आंदोलनात साजिद अत्तार, सलीम कुरणे, राजू म्हेतर, हरीदास पाटील, समीर कुपवाडे, साहेबपीर पिरजादे, नितीन वाघमारे, संजय शिंदे, दीपक दळवी, बाळू जाधव, अमित घाटगे, संतोष हारोळे, हणमंत कांबळे, प्रदीप जगदाळे, आदी सहभागी झाले.
सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त, राष्ट्रवादी रिक्षा युनियनची निदर्शने
By संतोष भिसे | Published: October 12, 2023 5:19 PM