शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

तांत्रिक लेखापरीक्षणानंतरही खड्डे

By admin | Published: March 27, 2016 11:43 PM

सहा महिन्यांत रस्ता निकामी : मालवण तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना कृती समितीचे निवेदन

वेंगुर्ले : येथील विकासकामांतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांचे तांत्रिक लेखापरीक्षण करून रस्त्याचे काम समाधानकारक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीतच हा रस्ता निकामी झाल्याने या कामाचे नमुने आपल्या समक्ष घेऊन प्रयोेगसहीत तपासणी करून अहवाल सादर करण्यासंंदर्भाचे निवेदन वेंगुर्ले नागरी कृती समितीने शासकीय तंत्रनिकेतन मालवणच्या प्राचार्य यांना दिले आहे.वेंगुर्ले नगरपरिषदेने मे २0१५ मध्ये केलेला प्रियदर्शनी होस्टेल ते हॉस्पिटल नाका या मार्गावरील रस्ता सहा महिन्यांच्या कालावधीतच निकामी झाला आहे. माहितीच्या अधिकारात या कामाच्या परिस्थितीची पहाणी केली असता रस्त्याचे काम १२ मे २0१५ पासून सुरू झाले. या कामास तंत्रनिकेतन मालवणच्या तज्ज्ञ प्राचार्यामार्फत तांत्रिक लेखापरीक्षण १७ मे २0१५ रोजी करण्यात आले व २0 जुलै २0१५ च्या पत्राद्वारे हे काम समाधानकारक झाले, असा अहवाल सादर केला आहे.याच कामासंदर्भात मुख्याधिकारी वेंगुर्ले नगरपरिषद यांना १५ मे २0१५ रोजी वेंगुर्ले नागरिक कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होेते की, १५ मे ते १५ आॅक्टोबर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये रस्त्याची कामे हाती घेऊ नयेत व प्रगतिपथावर असलेली कामे १५ मे पूर्वी पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, असे शासनाचे निर्देश आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरच वेंगुर्ले नगरपरिषदेने शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे हाती घेतली आहेत व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यासंंबंधी कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही व जागेवर मार्गदर्शक फलक लावलेले नाहीत. उन्हाळी सुटीमुळे मोेठ्या प्रमाणात पर्यटक वाहने शहरात आलेली आहेत. त्यांचा गोंंधळ होत असून, शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. अशा वातावरणात डांबरीकरणाची कामे अपेक्षित दर्जाची होेणार नाहीत व मुसळधार पावसामुळे डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडण्याची भीती आहे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे, असे हुले यांनी १५ मे २0१५ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले होते.त्यावेळी तांत्रिक लेखापरीक्षण करताना शासकीय तंत्रनिकेतनच्या तज्ज्ञ मंडळींनी वरील पत्राचे अवलोकन करणे आवश्यक होते. ठेकेदाराने निविदेमधील अनेक तरतुदींचे पालन न करता अत्यंत घाईगडबडीने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधीतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे १४,९१,९५0 रुपये एवढ्या सार्वजनिक निधीचा अपव्यय झालेला आहे. माहितीच्या अधिकारात या रस्त्याच्या कामाचे नमुने वेंगुर्ले नागरी कृती समितीच्या समक्ष घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करुन घेण्याची मागणी केली आहे. आपल्या संस्थेच्या तांत्रिक अधिकारी यांनी समितीच्या समक्ष या रस्त्याची पहाणी करुन रस्त्याच्या कामाचे नमुने त्रयस्तपणे तपासावेत, अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ले नागरी कृती समितीने शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य यांना दिले आहे.तसेच मुख्याधिकारी वेंगुर्ले नगरपरिषद यांनीही नागरी कृती समितीच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांगले रस्ते हा नागरिकांचा मुलभूत हक्क असल्याचा निर्णय २0१५ मध्ये दिलेला आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने केलेल्या काही रस्त्यांसंबंधी नागरी कृती समितीने माहितीच्या अधिकारात माहिती घेतलेली आहे. यामध्ये प्रियदर्शनी होस्टेल ते हॉस्पिटल नाका या मार्गावरील १४,९१,९५0 खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे आरंभपत्र फेब्रुवारी २0१५ मध्ये देण्यात आले. पण प्रत्यक्ष काम मे २0१५ मध्ये झाले. या निविदेमध्ये कामाच्या हमीची अट आहे. त्या रस्त्यावर सहा महिन्यांच्या आतच खड्डे पडले आहेत. समिर विश्रामगृह ते वडखोल रस्ता या कामाची कागदपत्रे पाहणीसाठी उपलब्ध झाली नाहीत. या रस्त्यावर तहसीलदार कार्यालय आहे.या रस्त्याची खडी पहिल्याच पावसात उखडली असून, हा रस्ता वापरासाठी निकामी झाला आहे. वडखोल रस्ता - शिवाजी प्राथमिक शाळा ते मुख्याधिकारी निवासया रस्त्याचे सन २0१२ मध्ये ९,४९,५४0 खर्चाचे डांबरीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्याच्या समर्थसृष्टी या म्हाडा वसाहतीच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ताही वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे. (प्रतिनिधी)