संख : वादळी वाऱ्याने पोल्ट्री कोसळून पांढरेवाडी (ता. जत) येथील विजय धोंडीराम म्हानवर यांचे २ लाख ७८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. २०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली.
पूर्व भागातील पांढरेवाडी येथील म्हानवर वस्तीवर विजय धोंडीराम म्हानवर यांची घराजवळ पोल्ट्री आहे. चार महिन्यांपूर्वी अडीच लाख
रुपये खर्च करून ती उभी केली होती. त्यामध्ये १५०० कोंबड्या होत्या. पूर्ण तयार झालेल्या अडीच किलो वजनाच्या १३०० कोंबड्यांची विक्री झाली केली आहे, तर २०० कोंबड्या शिल्लक होत्या.
गुरुवारी रात्री आठ वाजता सोसाट्याचा वारा सुटला. त्यात पोल्ट्री भुईसपाट झाली. २०० कोंबड्यांवर पत्रा, सिमेंटचे खांब पडले. त्यामुळे कोंंबड्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या.
शेड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकूण २ लाख ७८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
तलाठी सचिन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
व्याजाने पैसे घेऊन शेड
विजय म्हानवर यांनी शेतव्यवसायाला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. चार महिन्यांपूर्वी चार टक्के व्याजाने घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता.
फोटो ओळ : पांढरेवाडी (ता. जत) येथील विजय म्हानवर यांचे वादळी वाऱ्याने पोल्ट्री कोसळून नुकसान झाले.