शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या आठ दिवसांत पूर्ण उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने बुधवारी रोजी दुपारी वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले आहे. यामुळे वारणा नदीच्या पातळी कमी होत आहे.या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी दिली होती. यामुळे १ ऑक्टोबरला चारही वक्राकार दरवाजे उघडले होते. पावसाने उघडीप दिल्याने दि. ३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर फक्त वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. तोही आज दुपारी वीजनिर्मिती केंद्र बंद केल्याने धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.बुधवारी सकाळी ८ पर्यंत वीजनिर्मिती केंद्रातून ५०४ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. मात्र, त्यानंतर पाण्याची आवक पूर्ण थांबल्याने वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले आहे. यावर्षी या धरण परिसरात आजअखेर १८६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणात ३४.४० टीएमसीचा पाणीसाठा आहे.
Sangli: चांदोली धरणाचे वीजनिर्मिती केंद्र बंद, वारणा नदीच्या पाणीपातळीत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 1:46 PM